Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगशेअर बाजारात नवा स्कॅम, डिस्काउंट शेअरच्या नावाखाली लोकांची लाखोची फसवणूक

शेअर बाजारात नवा स्कॅम, डिस्काउंट शेअरच्या नावाखाली लोकांची लाखोची फसवणूक

सध्या शेअर बाजारात चांगली तेजी आहे. अशा स्थितीत अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारात मोठ्या स्थितीत गुंतवणूक करत आहेत. हीच बाब लक्षात घेता शेअर बाजाराशी निगडीत वेगवेगळे घोटाळे समोर येत आहेत. अशाच एका नव्या घोट्याळ्याबद्दल भारतीय राष्ट्रीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना सतर्क केले आहे.

 

नेशनल स्टॉक एक्स्चेज अर्थात NSE वेळोवेळी अशा फसवेगिरीबाबत सामान्य गुंतवणूकदारांना माहिती देत असते. आता पुन्हा एकदा एनएसईने नव्या फसवणुकीबाबत सांगितले आहे. कोणत्याही अनोळख्या व्यक्तीने किंवा संस्थेने कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दिल्यास त्याला बळी पडू नका, असे एनएसईने सांगितले आहे. अनेकजण तुम्हाला परताव्याची हमी (गॅरंटीड इन्कम) देतात. कधीकधी हेच फसवणूक करणारे तुम्हाला अन्य प्रकारे प्रलोभन देऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशा कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नका, असे आश्वासन एनएसईकडून दिले जाते. यावेळी तर शेअर बाजार बंद झाल्यानंतर डिस्काउंटवर शेअर देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली जात आहे. यावरच एनएसईने गुंतवणूकदारांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

 

नेमकं काय घडतंय? कशी होतेय फसवणूक?

एनएसईने सांगितल्यानुसार Jनावाचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. या ग्रुपविरोधात अनेक तक्रारी मिळाल्या आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून शेअर बाजार बंद झाल्यावर आम्ही तुम्हाला कमी भावात शेअर्स देऊ, अशी बतावणी केली जात आहे. याच प्रक्रियेला स्ट्रिट ड्रेडिंग नाव देऊन लोकांची फसवणूक केली जात आहे. याबाबतच्या तक्रारी मिळताच एनएसईने लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून अनेक लोकांकडून पैसे जमा करण्यात आले आहेत.

 

सेबीसोबत कोणतेही रजस्ट्रेशन नाही

लोकांना सावध करताना एनएसईने नावाची संस्था स्वत:ला एक रजिस्टर्ड ब्रोकर असल्याचे सांगत आहे. मात्र ही संस्था फॉर्ज्ड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा उपयोग करत आहे. लझार्ड असेट मॅनेजमेंट इंडिया नावाने सेबीजवळ कोणताही ब्रोकर रजिस्टर्ड नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या संस्थेपासून सावध राहा, असे सेबीने स्पष्ट केले आहे.

 

पैसे देताना अगोदर हे काम जरूर करा

सेबीने याबाबतच्या निवेदनात गुंतवणूकदारांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अशा कोणत्याही संस्थेवर विश्वास ठेवू नका. अशा प्रकारची कोणतीही संस्था किंवा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. कोणताही व्यवहार करू नया. कोणत्याही संस्थेशी आर्थिक व्यवहार करण्याआधी किंवा पैसे ट्रान्सफर करण्याआधी संबंधित व्यक्ती वा संस्थेच्या वैधतेबाबत एकदा जरूर जाणून घ्या, असे एनएसईने म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -