Saturday, July 26, 2025
Homeमहाराष्ट्र'या' पाच पेनी स्टॉक्सची हवा! अनेकांना दिले दमदार रिटर्न्स, तुम्हीही होणार का...

‘या’ पाच पेनी स्टॉक्सची हवा! अनेकांना दिले दमदार रिटर्न्स, तुम्हीही होणार का मालामाल?

गुरुवारी शेअर बाजारात अभूतपूर्व तेजी पाहायला मिळाली. गुरुवारी पहिल्यांचाद निफ्टीने 25400 अंकांपर्यंत मजल मारली. तर मुबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ऑल टाईम हाय नोदंवद 83000 अंकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी दुपारनंतर शेअर बाजारात ही घडामोडी दिसून आली. दरम्यान, आज शुक्रवारी मात्र आतापर्यंत तरी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झालेली दिसत नाही. उलट या दोन्ही निर्देशांकात किरकोळ पडझड झाली आहे. दरम्यान, आज शुक्रवारी शेअर बाजारावर दमदार रिटर्न्स देण्याची ताकद असलेल्या पाच पेनी स्टॉक्सबद्दल जाऊन घेऊ.

 

गुरुवारी काही पेनी स्टॉक्सने आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले. काही पेनी स्टॉक्सना तर 20 टक्क्यांपर्यंत अपर सर्किट लागलं. या पेनी स्टॉक्सचे मूल्य हे 13 रुपयांपासून ते 21 रुपयांपर्यंत आहे. याच शेअर्समध्ये शुक्रवारीही मोठे चढउतार पाहायला मिळू शकतात. हे पाच पेनी स्टॉक्स खालीलप्रमाणे आहेत.

 

डेकोरस इंन्वेस्टमेंट अँड ट्रेडिंग या स्टॉकमध्ये गुरुवारी 20 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. त्यामुळेच हा शेअर गुरुवारी 12.90 रुपयांवर बंद झाला होता. गुरुवारी या शेअरमध्ये अनेकांनी गुंतवणूक केली. शुक्रवारीदेखील या शेअरचे मूल्य वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सध्या हा शेअर 13 रुपयांवर आहे.

 

Gilada Fin. & Inv.

गिलाडा फायनॅन्स अँड इन्वेस्टमेंट हा शेअर गुरुवारी 20 टक्क्यांनी वाढला. गुरुवारी हा शेअर 13.22 रुपयांपर्यंत पोहोचला होता. शुक्रवारीही या शेअरमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. सध्या हा शेअर 14.64 रुपयांवर आहे. त्यामुळे सध्या गुंतवणूकदार या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकतात.

 

 

Indian Acrylics

इंडियन अॅक्रॅलिक्स हा शेअर गुरुवारी 17.80 टक्के वाढीसह 15.12 रुपयांवर स्थिरावला होता. शुक्रवारीदेखील या शेअरचे मूल्य वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण सध्या हा शेअर 1.98 टक्क्यांच्या घसरणीसह 14.82 टक्क्यांवर आहे. दिवसाअखेर पुन्हा या शेअरचे मूल्य वाढणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

RTCL Lt

आरटीसीएल लिमिटेड या कंपनीच्या शेअरमध्ये गुरुवारी 14.60 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. हा शेअर गुरुवारी 20.84 रुपयांपर्यंत वाढला होता. आजदेखील हा शेअर तेजीत असून 4.61 टक्क्यांच्या वाढीसह 21.80 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.

 

Pil Italica Lifestyle

पीआई इटालिका लाइफस्टाइल हा शेअर गुरुवारी 15 टक्के वाढीसह 15.10 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवारी या शेअरमध्ये वाढ होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र सध्यातीर हा शेअर 1.32 टक्क्यांच्या घसरणीसह 14.90 रुपयांवर घसरला आहे. आज दिवसाअखेर हा शेअर पुन्हा एकदा वाढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -