गुगल हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. गुगलमध्ये खूप चांगल्या पद आणि पगाराची नोकरी मिळते. त्यामुळे ही नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण ही नोकरी कशी मिळते? याबद्दल अनेकांना माहिती नसते. गुगलमध्ये फ्रेशर्सपासून अनुभवींना नोकरीच्या संधी आहेत. यासाठी तुमच्याकडे कोणते कौशल्य आणि किती शिक्षण हवे? नोकरी मिळण्याची प्रक्रिया काय आहे? सविस्तर जाणून घेऊया.
गुगलमध्ये जास्त पदे ही टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची असतात. यासाठी किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.टेक्निकल पदांसाठीी तुम्हाला जावा, सी++, जावा स्क्रिप्ट, डेटा स्ट्रक्चर, अल्गोरिदमची माहिती असणे आवश्यक आहे. तर नॉन टेक्निकलमध्ये मार्केटिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, बिझनेस एनालिस्ट अर्ज करु शकता. यासाठी तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स, टीम वर्क आणि प्रोब्लेम सॉल्विंग एबिलिटी असावी.
नोकरी मिळवण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे अधिकृत वेबसाइट http://(https://careers.google.com) वर जा. येथे विविध नोकऱ्यांची माहिती मिळेल. तुम्ही तुमच्या शिक्षण आणि अनुभवानुसार अर्ज करु शकता.
गुगलमध्ये नोकरी मिळवण्यात रेफरल्स हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तुमच्या ओळखीची एखादी व्यक्ती Google वर काम करत असल्यास, तुम्ही त्यांच्याकडून रेफरल मागू शकता. रेफरल्स तुमच्या अर्ज प्रक्रियेला गती देऊ शकतात आणि तुमचे प्रोफाइल अधिक लक्ष वेधून घेऊ शकतात.
तुमचा रेझ्युमे प्रोफेशनल आणि आकर्षक असावा. त्यात तुमचे शिक्षण, अनुभव, कौशल्ये आणि यशाचा स्पष्टपणे उल्लेख केला पाहिजे. तसेच कव्हर लेटरमध्ये, तुम्हाला गुगलमध्ये काम का करायचे आहे? आणि तुम्ही कंपनीच्या ध्येय आणि मूल्यांशी कसे जुळवून घेता ते नमूद करा.
Google ची मुलाखत प्रक्रिया खूप कठीण आहे, विशेषतः तांत्रिक पोस्टसाठी. यामध्ये ऑनलाइन ॲप्टिट्यूड टेस्ट,तांत्रिक मुलाखत,ऑनसाइट मुलाखत आणि नियुक्ती हे 4 टप्पे आहेत.
गुगलचा इंटर्नशिप प्रोग्राम जगभरात प्रसिद्ध आहे. फ्रेशर्सना गुगलच्या करिअर सेक्शनमध्ये संधी शोधता येते. आपल्या करिअरचा श्रीगणेशा करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. इंटर्नशिप दरम्यान, तुम्ही तुमची कौशल्ये वाढवू शकता आणि कायमस्वरूपी नोकरीच्या संधी देखील मिळवू शकता.