Wednesday, August 6, 2025
Homeमहाराष्ट्रईद-ए-मिलादनिमित्त बुधवारी बँका सुरु राहणार की बंद? जाणून घ्या

ईद-ए-मिलादनिमित्त बुधवारी बँका सुरु राहणार की बंद? जाणून घ्या

महाराष्ट्र सरकारने मुंबईतील ईद-ए-मिलादनिमित्त सुट्टीच्या तारखेत बदल केला होता. ही सुट्टी 16 सप्टेंबर 2024 रोजी होती. पण, आता ती 18 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर करण्यात आली आहे. म्हणजेच बुधवारी महाराष्ट्रात बँका बंद राहणार आहेत. गणेश विसर्जनात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून हे करण्यात आले आहे. या बदलानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही सुट्टीच्या यादीत बदल केला आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबईतील ईद-ए-मिलादची सुट्टी 16 सप्टेंबर 2024 ते 18 सप्टेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलली आहे. गणेश विसर्जनावर कोणताही संघर्ष होऊ नये म्हणून हा बदल करण्यात आले आहे. यानंतर, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 16 सप्टेंबर 2024 ची सुट्टी देखील रद्द केली.

 

आरबीआयने काय सांगितले?

आरबीआयने म्हटले होते की, ‘महाराष्ट्र सरकारने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा, 1881 च्या कलम 25 अंतर्गत 18 सप्टेंबर 2024 सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केली आहे.’ महाराष्ट्राव्यतिरिक्त, सिक्कीममध्ये 18 सप्टेंबर 2024 रोजी पांग-लाहबसोलसाठी बँका बंद राहतील.

 

सोमवार आणि मंगळवारी अनेक ठिकाणी बँका बंद

ईद-ए-मिलादच्या निमित्ताने सोमवारी, 16 सप्टेंबर 2024 रोजी देशभरात अनेक ठिकाणी बँका बंद होत्या. यामध्ये गुजरात, मिझोराम, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मणिपूर, जम्मू, केरळ, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांचा समावेश होता.

त्याचप्रमाणे मंगळवारी अनंत चतुर्दशीनिमित्त राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी होती. अशा परिस्थितीत, जर तुम्ही आज तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेला भेट देण्याचा विचार करत असाल, तर त्या उघडल्या आहेत की नाही हे पाहण्यासाठी RBI किंवा बँक शाखांची अधिकृत यादी तपासू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -