वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २३ सप्टेंबर २०२४ ला बुध आणि केतू एकत्र येत असल्यामुळे तीन राशींचे नशीब चमकू शकते. बुध आणि केतूची युती १८ वर्षानंतर तयार होत आहे ज्यामुळे तीन राशींना याचा अचानक धनलाभ होऊ शकतो आणि त्यांना जीवनात भरपूर यश मिळू शकते.
बुध ग्रह जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुभ स्थानावर असतो तेव्हा व्यक्तीला अचानक धनलाभ होऊ शकते. केतू हा एक छाया ग्रह आहे. अशात या युतीचा चांगला फायदा राशीचक्रातील काही राशींवर दिसून येईल. त्या नशीबवान राशी कोणत्या, हे आज आपण जाणून घेऊ या.
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीच्या लग्न भावामध्ये बुध केतूची युती निर्माण होत आहे. ज्यामुळे या लोकांचा आत्मविश्वास अचानक वाढेल. या लोकांना अचानक धन लाभ होऊ शकतो ज्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा राहीन. त्यांना नशीबाची साथ मिळू शकते ज्यामुळे प्रत्येक कामात यश मिळेन. करिअरच्या दृष्टीकोनातून विचार केला तर या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील आणि याचा या लोकांना भरपूर लाभ होईल.
धनु (Dhanu Rashi)
धनु या राशीच्या कर्म भावात ही युती तयार होत आहे. त्यामुळे व्यवसाय करणाऱ्या या राशीच्या लोकांना याचा चांगला फायदा होऊ शकतो. ज्या लोकांना नोकरी नाही किंवा नोकरीच्या शोधात आहे त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. व्यवसायात वाढ होईल. हे लोक नवीन काम सुरू करू शकतात. कुटुंबात विशेषत: वडीलांचे सहकार्य लाभेल.
मकर (Makar Rashi)
मकर राशीच्या नवव्या भावात बुध आणि केतूची युती निर्माण होत आहे ज्यामुळे या राशीच्या लोकांचे नशीब पालटू शकते. त्यांच्या कार्यक्षमतेच्या जोरावर ते कठीण कामातून मार्ग काढतील. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार. देश विदेशात प्रवास करण्याचे योग दिसून येतील.