Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाअफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमने रचला इतिहास, पहिल्यांदा मोठ्या संघांविरुद्ध जिंकली वनडे सीरीज

अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमने रचला इतिहास, पहिल्यांदा मोठ्या संघांविरुद्ध जिंकली वनडे सीरीज

T20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल पर्यंत मजल मारणाऱ्या अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमने नवीन इतिहास रचला आहे. त्यांनी 20 सप्टेंबरला शुक्रवारी बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीज जिंकली. शारजाह येथे झालेल्या सामन्यात हशमतुल्लाह शहीदीच्या नेतृत्वाखाली टीमने 177 धावांनी विजय मिळवला. वनडेमधील अफगाणिस्तानचा हा मोठा विजय आहे. या सोबतच अफगाणिस्तानच्या टीमने 3 मॅचच्या वनडे सीरीजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेला वनडे सीरीजमध्ये हरवलं. अफगाणिस्तानने पहिली बॅटिंग केली. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 312 धावांच टार्गेट ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची टीम 134 रन्सवर ऑलआऊट झाली.

अफगाणिस्तानचा कॅप्टन हशमतुल्लाह शहीदीने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रहमनुल्लाह गुरबाजच्या 105 धावा आणि अजमतुल्लाह ओमरजईच्या तुफानी 86 धावांच्या बळावर अफगाणिस्तानने 311 धावांचा डोंगर रचला. दक्षिण आफ्रिकेकडून कॅप्टन टेम्बा बावुमा आणि टोनी डी जॉर्जीच्या जोडीने 73 धावांची सलामी दिली. त्यानंतर बावुमाला ओमरजईने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. बावुमा बाद होताच विकेटची रांग लागली. दक्षिण आफ्रिकेने 61 धावात 10 विकेट गमावले.

अजमतुल्लाह ओमरजईने दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर टीमचा दिग्गज स्पिनर राशिद खान आणि नांगेलिया खरोटेने कमालाची गोलंदाजी केली. या दोघांच्या फिरकीसमोर बावुमाच्या टीमने गुडघे टेकले. दोघांनी मिळून 9 विकेट काढल्या. राशिदने 9 ओव्हरमध्ये फक्त 19 धावा देऊन 5 विकेट काढले. नांगेलियाने 6.2 ओव्हर्समध्ये 26 धावा देऊन 4 विकेट काढले. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेचा डाव 134 धावात आटोपला. पहिल्या वनडे सामन्यातही दक्षिण आफ्रिकेचा डाव 106 धावात गडगडला होता. अफगाणिस्तानने हे लक्ष्य आरामात पार केलं होतं.

 

अजमतुल्लाह ओमरजई गोलंदाजांवर तुटून पडला

 

अफगाणिस्तानचा कॅप्टन हशमतुल्लाह शहीदीने पहिली फलंदाजी स्वीकारली. त्याचा हा निर्णय टीमच्या ओपनर्सनी योग्य ठरवला. रहमनुल्लाह गुरबाज आणि रियाज हसनने मिळून पहिल्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. त्यानंतर अफगाणिस्तानला पहिला धक्का बसला. गुरबाजने रहमत शाहसोबत मिळून 101 धावांची भागीदारी केली. टीमची धावसंख्या 189 असताना रहमत शाह 50 धावांवर आऊट झाला. त्यानंतर अजमतुल्लाह ओमरजई चौथ्या नंबरवर फलंदाजीला आला. त्याने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने 50 चेंडूत 172 च्या स्ट्राइक रेटने 86 धावा ठोकल्या. यात 6 सिक्स आणि 5 फोर होते. दुसऱ्याबाजूला गुरबाजने वनडे करियरमधील सातव शतक झळकावलं.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -