बॉलिवूड अभिनेता प्रवीण डबासचा भीषण कार अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. प्रवीण डबासचा भीषण कार अपघात झाला असून त्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
गंभीर जखमी अवस्थेत अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी सकाळी मुंबईत प्रवीण डबासचा कार अपघात झाला. अपघातानंतर जखम प्रवीणला मुंबईतील वांद्रे येथील रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आलं आहे.
अभिनेता प्रवीण डबासचा भीषण कार अपघात
प्रसिद्ध वीण डबासचा भीषण अपघात झाला असून तो गंभीर जखमी झाला आहे. प्रवीणची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचं समोर आलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, प्रवीणची पत्नी प्रीति झांगियानी सध्या त्याच्यासोबत रुग्णालयात आहे. वांद्रे येथील हेली क्रॉस रुग्णालयात प्रवीण डबासला उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
अभिनेत्याच्या पत्नीने दिली माहिती
प्रवीण डबास यांची पत्नी प्रीती झिंगियानी यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “या अपघातानंतर मला आणि माझ्या कुटुंबाला प्रचंड धक्का बसला आहे. मेडिकल अपडेटनुसार, प्रवीणला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला सीरियस कंसशन म्हणजेच मेंदूला गंभीर दुखापत झाल्यानंतरच्या स्थितीत आहे. त्याला आणखी दुखापत झाली आहे का, हे पाहण्यासाठी डॉक्टरांकडून सीटी स्कॅन आणि इतर चाचण्या करण्यात येत आहेत.तो या क्षणी जास्त हालचाल करू शकत नाही. अपघातापूर्वी तो त्याच्या कामाच्या ओझ्यामुळे फार व्यस्त होता.
अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका
बॉलिवूड अभिनेता प्रवीण डबास सध्या 50 वर्षांचा आहे. अभिनेता प्रवीण डबास अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये दिसला आहे. प्रवीणने आतापर्यंत दिल्लगी, मान्सून वेडिंग, खोसला का घोंसला, द हीरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय, मैने गांधी को नही मारा, ये है जिंदगी, कुछ मीठा हो जाए, इंदू सरकार, रागिनी एमएमएस 2, हे अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.