Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रदोनच आठवड्यात संग्राम चौगुले यांनी घेतला बिग बॉसचा निरोप

दोनच आठवड्यात संग्राम चौगुले यांनी घेतला बिग बॉसचा निरोप

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून आठव्या आठवड्यात Wildcard स्पर्धक म्हणून आलेल्या संग्राम चौगुलेने एक्झिट घेतली आहे. कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कदरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली होती.

 

 

त्यामुळे त्याला घरातील कोणतंही काम करता येणार नव्हतं. याशिवाय तो टास्कमध्ये देखील सहभागी होऊ शकला नसता. त्यामुळेच संग्रामला आरोग्याची काळजी घेण्यासाठी घराचा निरोप घ्यावा लागला.

 

रितेश काही कामानिमित्त परदेशात असल्याने यंदा भाऊच्या धक्क्याऐवजी घरात ‘महाराष्ट्राचा धक्का’ पार पडला. या एपिसोडमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी झालेल्या प्रत्येक सदस्याला यावेळी प्रश्न विचारण्यात आले. डॉ. निलेश साबळे व घरात उपस्थित राहिलेले पत्रकार बाहेर आल्यावर, ‘बिग बॉस’ने संग्रामला कन्फेशन रुममध्ये बोलावून घेतलं.

 

‘बिग बॉस’ने संग्रामला डॉक्टरांनी दिलेली माहिती देत विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला ताबडतोब दारावर लावलेली नावाची पाटी घेऊन घराबाहेर बोलावण्यात आलं. संग्रामने घराचा निरोप घेतल्यावर काही सदस्यांनी त्याच्या आरोग्याबद्दल काळजी देखील व्यक्त केली. मात्र, नेटकऱ्यांना हा निर्णय पटलेला नाही. अरबाजला वाचवण्यासाठी संग्रामला बाहेर काढल्याचे सूर सध्या सोशल मीडियावर उमटले आहेत. आता संग्राम बाहेर गेल्यामुळे गेल्या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या अरबाज, वर्षा, निक्की, सूरज आणि जान्हवी या पाच सदस्यांपैकी कोणीही बाहेर न जाता सगळे वाचणार असा अंदाज नेटकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, कोणाचा प्रवास संपणार की सगळे सदस्य सेफ होणार याबद्दल अधिकृत माहिती रविवारच्या ( २२ सप्टेंबर ) भागात मिळेल. अशातच ‘बिग बॉस’मधून एक्झिट घेतलेल्या संग्रामने घराबाहेर आल्यावर त्याची पहिली पोस्ट शेअर केली आहे.

 

‘बिग बॉस’च्या घराबाहेर आलेला संग्राम त्याची पहिली इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत लिहितो, ‘मला झालेल्या काही गंभीर दुखापतींमुळे घरातून बाहेर जावं लागलं. तुम्ही आजपर्यंत जे प्रेम दिलं ते मी माझ्याबरोबर घेऊन जात आहे… तुम्हा सर्वांचं प्रेमच मला लवकर रिकव्हर व्हायला मदत करेल. ‘बिग बॉस’च्या घरात खेळताना तुम्ही सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलंत त्याबद्दल मनापासून आभार.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -