Friday, November 22, 2024
Homeतंत्रज्ञानBSNL ला मिळाले 29 लाख नवे ग्राहक; Airtel-Jio ला दणका

BSNL ला मिळाले 29 लाख नवे ग्राहक; Airtel-Jio ला दणका

Airtel-Jio सारख्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या मोबाईल रिचार्जच्या किमतीत मोठी वाढ केल्याने सर्वसामान्य ग्राहकांना चांगलाच फटका बसला. रिचार्जच्या किमती खिशाच्या बाहेर जाऊ लागल्याने अनेक ग्राहकांनी आपला मोर्चा देशी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडे वळवला. बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्त असल्याने अनेकांनी आपलं जून सिमकार्ड बीएसएनएल मध्ये पोर्ट केलं तर काही यूजर्सनी नवीन बीएसएनल सिमकार्ड घेतलं. या परिणाम म्हणजे जुलै महिन्यात जिओ, एअरटेल आणि वीआय या कंपन्यांच्या ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे. तर, बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत वाढ झाली आहे. जुलै मध्ये बीएसएनएलला तब्बल 29 लाख नवे ग्राहक मिळाले. कंपनीसाठी हि सर्वात मोठी उपलब्धी असून एअरटेल आणि जिओ साठी हा मोठा दणका आहे.

 

न्यूज एजन्सी पीटीआयच्या रिपोर्टनुसार ट्रायच्या हवाल्यानं ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार जुलै महिन्यात जिओचे ग्राहक 7.58 लाखांनी कमी झाले आणि व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांची संख्या 14.1 लाखांनी कमी झाली आहे. मात्र, या दोन्ही कंपन्यांपेक्षा सर्वात जास्त तोटा एअरटेलला सोसावा लागला आहे. कारण जुलैमध्ये एअरटेलने सर्वाधिक 16.9 लाख ग्राहक गमावले आहेत. या सर्व गोष्टींचा फायदा हा ऑटोमॅटिकच बीएसएनएलला झाला. या काळात BSNL ला तब्बल 29 लाख नवे ग्राहक मिळाले. कंपनीसाठी हा एकप्रकारे मोठा रेकॉर्ड आहे.

 

दरम्यान, ग्राहकांची वाढती मागणी पाहता बीएसएनएल सुद्धा आपलं नेटवर्क आणखी वाढवण्यावर भर देत आहे. बीएसएनएल लवकरच संपूर्ण देशात 4G सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. तसेच देशभरात १ लाख बीएसएनएल टॉवर उभारण्याची सुद्धा कंपनीची योजना आहे. BSNL हे येत्या काही वर्षांमध्येच 4G नेटवर्क सविस्तर सर्वत्र करणार आहे. 2025 च्या मध्यापर्यंत BSNL चे जवळपास एक लाख नवीन 4G टॉवर्स बसवले जाणार आहेत. तसेच या देशातील 25000 गावे याद्वारे जोडली जाणार आहेत. त्यामुळे गावांमध्ये देखील दूरसंचार सुविधा आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल. अजूनही अनेक गावांमध्ये BSNL ची सुविधा उपलब्ध नाही. परंतु 2025 च्या मध्यापर्यंत सर्वत्र ही सुविधा उपलब्ध होणार आहे अशी माहिती मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -