Saturday, December 21, 2024
Homeनोकरीसणासुदीमुळे ई-कॉमर्समध्ये लाखो रोजगारांची निर्मिती; ॲमेझॉनमध्ये एक लाखाहून अधिक नोकऱ्या

सणासुदीमुळे ई-कॉमर्समध्ये लाखो रोजगारांची निर्मिती; ॲमेझॉनमध्ये एक लाखाहून अधिक नोकऱ्या

आगामी सणासुदीच्या काळावर लक्ष केंद्रित करत ई-कॉमर्स कंपन्यांनी हंगामी कर्मचारी भरती करण्यासह आपले वाहतूक जाळे तसेच गोदामांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे देशात लाखो हंगामी नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

 

ॲमेझॉन इंडियाने दिल्ली एनसीआर, गुवाहटी आणि पाटणा येथे तीन नवी फुलफिलमेंट सेंटर सुरू केल्याची घोषणा केली आहे. यामुळे उत्तर आणि पूर्व भारतातील घरपोच वस्तू देण्याचा वेग वाढणार आहे. यातील गुंतवणुकीमुळे या राज्यांतील २.५ लाखांहून अधिक विक्रेत्यांना होणार आहे.

 

या भागातील आर्थिक उलाढाल वाढण्यासह अधिक रोजगारांची निर्मिती होण्यास चालना मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे. आसामचे मुख्यमंत्री डॉ. हेमंता बिस्वा सर्मा यांनीही ‘ॲमेझॉन’च्या या उपक्रमामुळे अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. सध्या देशात कंपनीची १९ राज्यांत २००० केंद्रे असून, जलद वाहतूकीसाठी भारतीय रेल्वे व टपाल खात्याशी भागीदारी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -