Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रमाझी लाडकी बहीण योजनेत अर्ज केला परंतु पैसेच आले नाहीत? नका करू...

माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज केला परंतु पैसेच आले नाहीत? नका करू काळजी! ‘या’ ठिकाणी करा तक्रार

आपल्याला माहित आहे की या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून करण्यात आलेली आहे व ज्या महिलांचा अर्ज जुलै महिन्यामध्ये मंजूर करण्यात आलेले होते त्या महिलांना सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपयांचा लाभ देण्यात आला व आता महिलांना या योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या म्हणजेच तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

 

काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या तिसऱ्या हप्त्याबाबत निर्णय घेण्यात आला असून साधारणपणे 29 सप्टेंबर रोजी या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील किंवा या तिसऱ्या हप्त्याचे जर पैसे येणार नाहीत तर तुम्ही याबाबतची चौकशी करू शकणार आहात.

 

महाराष्ट्रवादीव्हाट्सअपहेल्पलाइनक्रमांककरेलतुम्हालामदत

 

ज्या महिलांच्या खात्यामध्ये 29 सप्टेंबरला येऊ घातलेल्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे येणार नाहीत किंवा अजून पर्यंत या योजनेत अर्ज केला आहे परंतु पैसे आले नाहीत अशा महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या माध्यमातून महाराष्ट्रवादी व्हाट्सअप हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आलेले असून यामध्ये तुम्हाला 9861717171 या क्रमांकाशी संपर्क साधावा लागणार आहे.

 

या क्रमांकाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या समस्या सांगायच्या असून या समस्या सांगितल्यानंतर तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस कडून 72 तासाच्या आतमध्ये कॉन्टॅक्ट केला जाईल व तुमच्या समस्या सोडवल्या जातील.

 

कशाप्रकारचीआहेयानंबरवरसमस्यासोडवण्याचीप्रक्रिया?

 

वर तुम्हाला जो काही नंबर दिलेला आहे त्यावर तुम्हाला व्हाट्सअप करावे लागेल व त्या ठिकाणी तुम्हाला तुमची भाषा तसेच जिल्हा, मतदार संघ व लिंग इत्यादी गोष्टी निवडावे लागतील.

 

यामध्ये तुम्हाला ज्या योजनेची माहिती हवी असेल ती योजनेची निवड करावी लागेल. यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजना निवडावी लागेल व या योजनेबद्दल तुम्हाला कुठली समस्या असल्यास मदत हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुमची तक्रार त्या ठिकाणी नोंदवली जाते व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्याशी संपर्क साधते.

 

याहेल्पलाइनक्रमांकावरदेखीलकॉलकरूनतक्रारनोंदवूशकतात

 

माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जर महिलेच्या खात्यात आत्तापर्यंत हप्त्याची रक्कम जमा झाली नसेल तर अशा महिलांना 181 या हेल्पलाइन क्रमांक वर देखील कॉल करता येणार आहे व आपली तक्रार दाखल करता येऊ शकणार आहे. अंगणवाडी केंद्रात जाऊन देखील तक्रार दाखल करता येणार आहे व त्यानंतर तुमच्या तक्रारीचे निवारण केले जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -