Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंगअभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा घटस्फोट? लग्नाच्या 8 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा घटस्फोट? लग्नाच्या 8 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय

आता उर्मिला मातोंडकर संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. उर्मिला मातोंडकरने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे. उर्मिला मातोंडकर लग्नाच्या आठ वर्षांनंतर घटस्फोट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

 

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा घटस्फोट

 

उर्मिला तिचा पती मोहसिन अख्तर मीर याला घटस्फोट देणार आहे. उर्मिलाने मुंबई न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. उर्मिलाने 2016 मध्ये बिझनेसमन मोहसिन मीरसोबत लग्न केले. आता एका रिपोर्टनुसार उर्मिला लग्नाच्या 8 वर्षांनंतर तिच्या पतीपासून विभक्त होणार आहे.

 

लग्नाच्या 8 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय

 

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने लग्नाच्या 8 वर्षांनंतर कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. उर्मिला मातोंडकरचा हा घटस्फोट परस्पर संमतीने होत नसल्याचेही सूत्रांच्या हवाल्याने बोललं जात आहे. हिंदुस्तान टाइम्सने मुंबई न्यायालयाशी संबंधित एका सूत्राचा हवाला देत ही माहिती दिली आहे.

 

उर्मिला मातोंडकरचा घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज

 

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने यासंदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘खूप विचार केल्यानंतर उर्मिलाने मोहसीनसोबतचे विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी तिने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. घटस्फोटामागचं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी घटस्फोट परस्पर संमतीने होत नसल्याचं समोर येत आहे.

 

दोघांच्या वयात 10 वर्षांचा फरक

 

उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर मीर यांनी 4 फेब्रुवारी 2016 रोजी गुपचूप लग्न उरकलं होतं. त्यावेळी त्यांच्या लग्नाने खूप चर्चा झाली होती, कारण दोघेही वेगवेगळ्या धर्माचे होते. याशिवाय दोघांच्या वयात 10 वर्षांचा फरक होता. खरं तर उर्मिला पती मोहसिनपेक्षा 10वर्षांनी मोठी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -