BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) हि भारतातील सरकारी दूरसंचार कंपनी आहे, जी 2000 साली स्थापन करण्यात आली. BSNL देशभरात दूरसंचार सेवा प्रदान करते, ज्यात मोबाईल सेवा, लँडलाईन, ब्रॉडबँड, इंटरनेट सेवा, आणि इतर टेलिकॉम सेवा समाविष्ट आहेत. एकीकडे देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या असलेल्या एअरटेल आणि जीओने मोबाईल रिचार्जच्या प्लॅनमध्ये वाढ केल्यानंतर अनेक ग्राहकांचा कल हा बीएसएनएलकडे वळत आहे.
कंपनी सुद्धा ग्राहकांना परवडेल अशा किमतीत नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रिचार्ज प्लॅन बद्दल सांगनार आहोत ज्यामध्ये बदल करत कंपनीने ग्राहकांना जास्तीचे इंटरनेट देण्याची सुविधा केली आहे. हा प्लॅन कोणता आहे? ग्राहकांना काय फायदा मिळेल? हेच आपण सविस्तर जाणून घेऊयात…
आम्ही तुम्हाला ज्या प्लॅन बद्दल सांगत आहोत तो आहे बीएसएनलचा 80 दिवसांचा रिचार्ज प्लॅन…. या प्लॅनसह काही नवीन ऑफर घेऊन BSNL आपल्या युजर्सना अधिक सेवा आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देत आहे. 151 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 80 दिवसांची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड कॉलिंगसह 2GB डेटा रोज ग्राहकांना मिळणार आहे. या प्लॅनकडे ग्राहक आकर्षित व्हावे यासाठी पूर्वीच्या प्लॅन मध्ये बदल करून आता हि सेवा देण्यात आली आहे . आधी या प्लॅनमध्ये युजर्सना 1.5GB डेली डेटा मिळत होता. आता त्यात वाढ करून दररोज 2GB इंटरनेट डेटा ग्राहकांना देण्यात येईल. ही ऑफर BSNL युजर्ससाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे, ज्यामुळे युजर्सना कमी खर्चात अधिक इंटरनेट आणि कॉलिंग सुविधांचा लाभ घेता येईल.
काही प्लॅन जसेच्या तसेच उपलब्ध –
BSNL ने अनेक प्रीपेड प्लॅन्समध्ये बदल जरी केले असले तरी काही ठराविक प्लॅन्समध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामध्ये 108 रुपयाचा कमी कालावधीचा प्लॅन आणि 1999 रू तसेच 2999 रुपयाच्या जास्त कालावधीचा प्लॅन जसेच्या तसे आहेत. त्यामध्ये बदल केला नसून ग्राकाना ते आधीसारखे वापरण्यास मिळतील. त्याचबरोबर सोबत मिळणारे 100 मोफत SMS तसेच राहतील.
दरम्यान, मागील काही महिन्यापासून बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जुलै मध्ये बीएसएनएलला तब्बल 29 लाख नवे ग्राहक मिळाले. कंपनीसाठी हि सर्वात मोठी उपलब्धी असून एअरटेल आणि जिओ साठी हा मोठा दणका आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता बीएसएनएल सुद्धा आपलं नेटवर्क आणखी वाढवण्यावर भर देत आहे. बीएसएनएल लवकरच संपूर्ण देशात 4G सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. तसेच देशभरात १ लाख बीएसएनएल टॉवर उभारण्याची सुद्धा कंपनीची योजना आहे