आता राज्य शासनाच्या निर्देशानुसार, या भरती प्रक्रियेला मुहूर्त लागला असून विभागांतर्गत ६१४ पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. (finally time for recruitment of tribals)
शनिवारी (ता.१२) दुपारी ३ वाजेपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरता येणार आहे. २ नोव्हेंबरला अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. भरतीत विभागातील उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ लिपिक सह एकूण १४ पदांचा यात समावेश आहे.
आदिवासी विकास विभागाने सुधारित आकृतिबंध मंजूर केला असून शासन निर्णय वित्त विभाग ३१ ऑक्टोबर २०२२ अन्वये ज्या विभागाचा सुधारित आकृतिबंध मंजूर आहे. त्या विभाग/कार्यालयातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास मान्यता दिली आहे.
त्यानुसार आदिवासी विकास विभाग आयुक्त यांनी त्यांच्या अंतर्गत अपर आयुक्त, कार्यालय नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर यांचे अधिनस्त आस्थापनेवरील विविध भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील नमूद सरळसेवेची पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या पात्रतेनुसार आहे.
रिक्त पदांचा तपशील
एकूण जागा : ६१४
पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक (१८), संशोधन सहायक (१९), उपलेखापाल-मुख्य लिपिक (४१), आदिवासी विकास निरिक्षक (१), वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक (१४८), लघुटंकलेखन (१०), गृहपाल (पुरुष) (६२), गृहपाल (स्त्री) (२९), अधिक्षक (पुरुष) (२९), अधिक्षक (स्त्री) (५५), ग्रंथपाल (४०), ग्रंथपाल सहाय्यक (६), प्रयोगशाळा सहाय्यक (३३), कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी (४५), कॅमेरामन-कम-प्रोजेक्ट ऑपरेटर (१) एकूण (५३७).