एकीकडे ऑक्टोबर हीटचा तडाखा बसत असताना काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेकदा नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या व मध्यम सरीचा पाऊस कोसळेल. 22 ऑक्टोबरला राज्यातील उत्तर महाराष्ट्रातून मान्सून निघून जाणार आहे. त्यानंतर 23 ऑक्टोबरला राज्यातील मराठवाडा विभागातील मान्सून माघारी फिरणार आहे आणि 24 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार असा दावा हवामान तज्ज्ञ करत आहेत. याशिवाय, येत्या 5 नोव्हेंबरपासून थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवा़ा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.