Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगसणासुदीत सोन्याने तोडले सर्व रेकॉर्ड; चांदी पण सुसाट, भाव तरी काय?

सणासुदीत सोन्याने तोडले सर्व रेकॉर्ड; चांदी पण सुसाट, भाव तरी काय?



दिवाळी आता तोंडावर आली आहे. त्यापूर्वीच मौल्यवान धातुनी चमत्कार दाखवला. सोन्याने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड गुंडाळून ठेवले. तर चांदीने मोठी मुसंडी मारली. दिवाळीला लक्ष्मी पुजनासाठी खरेदीचा बेत आखत असाल तर आता गाठीशी जास्त पैसा ठेवा. कारण तोपर्यंत दोन्ही धातु अधिक महागण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी सोने दिवाळीत 80 हजारांचा टप्पा गाठेल असा अंदाज होता. तर आता हा आकडा 85,000 रुपयांच्या घरात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. तर चांदी एक लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. स्थानिक बाजारपेठेनुसार किंमतीत चढउतार दिसतात. त्यात जीएसटी रक्कम गृहीत धरल्यास यया सणासुदीला ग्राहकांचा मोठा खिसा कापल्या जाणार असल्याचे स्पष्ट होते. आता असा आहे सोने आणि चांदीचा भाव

 

सोन्याची तुफान बॅटिंग

 

सोन्याने या आठवड्याची सुरुवात पडझडीने केली. 15 ऑक्टोबर रोजी सोने 220 रुपयांनी स्वस्त झाले. 16 ऑक्टोबर रोजी सोने 490 रुपयांनी वधारले. 17 सप्टेंबर रोजी त्यात 220 रुपयांची भर पडली. तर 18 ऑक्टोबर रोजी सोन्याने 870 रुपयांची मुसंडी मारली. आज सकाळच्या सत्रात सोन्यात महागाईचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

चांदीची मोठी उसळी

 

मागील 20 दिवसांत चांदीत मोठी घडामोडी घडली नव्हती. 5 ऑक्टोबरला चांदी 2 हजारांनी वधारली तर 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी चांदी 3 हजार रुपयांनी स्वस्त झाली होती. 11 ऑक्टोबरला चांदी 2 हजारांनी वधारली होती. तर या आठवड्याच्या अखेरच्या टप्प्यात 18 ऑक्टोबर रोजी चांदीने 2 हजारांचा डाव साधला. या दरवाढीमुळे गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,000 रुपये झाला आहे.

 

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

 

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,410, 23 कॅरेट 77,100, 22 कॅरेट सोने 70,908 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 58,058 रुपये, 14 कॅरेट सोने 45,285 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 92,283 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

 

घरबसल्या जाणून घ्या भाव

 

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -