टीम इंडियाने न्यूझीलंडला पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी विजयासाठी 107 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या 356 धावांच्या प्रत्युत्तरात 99.3 ओव्हहरमध्ये ऑलआऊट 462 धावा केल्या. टीम इंडियाने यासह 106 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे आता न्यूझीलंडला 107 धावांचं आव्हान मिळालं. सामन्यात चौथ्या दिवसात काही षटकाचां आणि पाचव्या दिवसाचा संपूर्ण खेळ बाकी आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट आहे. आता टीम इंडियाचे गोलंदाज या 107 धावांचा बचाव करणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.