रिलायन्स जिओ ही एक लोकप्रिय टेलिफोन कंपनी आहे. त्यांच्यासोबत कितीतरी ग्राहक जोडले गेले आहेत. त्यांच्या ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी जिओ वेगवेगळे रिचार्ज असतात.
जिओने जुलै महिन्यामध्ये त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये (Jio New Recharge Plan) मोठ्या प्रमाणात वाढ केली. त्यामुळे कंपनीचे अनेक ग्राहक नाराज झाले होते. परंतु आता त्याच ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी जिओनने अनेक प्लॅन आणले आहेत. जे ग्राहकांना देखील आता आवडत आहेत. आणि अनेक नवीन ग्राहक देखील जिओ सोबत जोडले जात आहेत.
ग्राहकांच्या गरजा तसेच इतर गोष्टी लक्षात घेता जिओने जास्त व्हॅलिडीटी असलेल्या अनेक प्लॅन्स आता लॉन्च केलेले आहेत. जिओने 84 दिवसांच्या व्हॅलिडिटी सह एकापेक्षा एक चांगले प्लॅन्स आणले आहेत. जर तुम्ही देखील जिओचे युजर असाल तर 84 दिवसांचा हा प्लॅन अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. आता हा प्लॅन नक्की काय आहे? यातून कोणते फायदे मिळणार आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.
जिओच्या (Jio New Recharge Plan) पोर्टफोलिओ मधली 84 दिवसांचा व्हॅलिडीटी प्लॅन हा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत 799 रुपये एवढी आहे. तसेच हा प्लॅन तुम्ही 84 दिवसांसाठी वापरू शकता. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड फ्री कॉलिंग आहे तसेच जिओच्या ग्राहकांना जर 100 फ्री एसएमएसची सुविधा देखील यामध्ये दिली जात आहे.
जिओच्या या 84 दिवसांच्या व्हॅलिडीटी प्लॅनमध्ये तुम्हाला तर 1.5 जीबी डेटा वापरता येणार आहे. म्हणजेच संपूर्ण 126 GB डेटा दिलेला आहे. जिओचा हा प्लॅन अनलिमिटेड आहे. तुम्हाला फ्री 5G डेटाचा लाभ मिळणार नाही. जिओच्या ग्राहकांना या इतर प्लॅनप्रमाणे अतिरिक्त फायदे देखील मिळणार आहे. तुम्हाला चित्रपट, वेब सिरीज पाहण्याची आवड असेल, तर तुम्हाला जिओ सिनेमाची फ्री सबस्क्रिप्शन दिले जाते. तसेच जिओ टीव्ही, जिओ क्लाउड यांचा ऍक्सेस देखील दिला जातो. म्हणजेच जिओचा हा 84 दिवसांचा रिचार्ज प्लान तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.