Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगपेन्शनधारकांना जीवन प्रमाण पत्र आता घरपोच किंवा पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार

पेन्शनधारकांना जीवन प्रमाण पत्र आता घरपोच किंवा पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार

आधार प्रमाणीकरणासह डिजिटल लाइफ सर्टिफिकेट पूर्णपणे पेपरलेस असल्याने त्वरित दिले जाणार आहे. अशी माहिती पुणे जिल्हा (ग्रामीण) डाकघर विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी दिली आहे.

 

पेन्शनधारकांना हे 70 रुपये नाममात्र शुल्कात सेवा उपलब्ध आहे. तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या प्रीमियम खातेधारकांना 50 टक्के सवलत दिली जाते. निवृत्तीवेतनधारकाने DLC तयार करण्यासाठी खालील माहिती बाळगणे आवश्यक आहे. पेन्शन आयडी, पेन्शन पेमेंट ऑर्डर, पेन्शन वितरण विभाग, पेन्शन खाते असणाऱ्या बँकेचे नाव, मोबाईल नंबर व आधार क्रमांक सोबत असणे आवश्यक आहे.

 

दरम्यान, डिजिटल लाइफ सर्टिफिकेट हे केंद्र सरकार, राज्य सरकार, ईपीएफओ किंवा इतर कोणत्याही सरकारचे पेन्शनधारक संस्था इत्यादींना नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये आद्ययावत करणे अनिवार्य असते.

 

डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाठवलेल्या प्रमाण आय डी सह त्वरित तयार केले जाईल. तुमचे प्रमाणपत्र तपशील पेन्शन विभागाकडे आपोआप अपडेट केले जातील. ज्या पेन्शनधारकांचे बोटांचे ठसे फिक्कट झाले असतील त्यांनी घराजवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क करावा. तसेच पेन्शनधारकांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या प्रीमियम खाते उघडून 50 टक्के सवलतीचा फायदा घ्यावा.

-बाळकृष्ण एरंडे (अधीक्षक – जिल्हा ग्रामीण डाकघर विभाग पुणे)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -