Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात ऊन- पावसाचा खेळ सुरू, अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार; सतर्कतेचा...

राज्यात ऊन- पावसाचा खेळ सुरू, अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार; सतर्कतेचा इशारा

त्याचा वेग 100-110 किमी प्रति तास आणि 120 किमी प्रति तासपर्यंत पुढे सरकू शकते. या चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण देशभरामध्ये पाहायला मिळणार आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वमध्य बंगालच्या उपसागरामध्ये दाना चक्रीवादळ तयार झाले आहे. ते चक्रीवादळ वायव्येकडे सरकण्याची आणि 24 तारखेच्या पहाटे वायव्य बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. 24 ऑक्टोबरच्या रात्रीपासून ते 25 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत तारखेच्या दरम्यान भितरकनिका आणि धामारा (ओडिशा) जवळ पुरी आणि सागर बेटांदरम्यान उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टी ओलांडून पुढे जाण्याची शक्यता आहे. 25 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 100-110 किमी प्रतितास वेगाने 120 किमी वेगाने वाऱ्यासह हे चक्रीवादळ पुढे सरकरण्याची शक्यता आहे. 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2024 रोजी ओडिशा, पश्चिम बंगालमधील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अशामध्ये पुणे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दाना चक्रीवादळचा परिणाम म्हणून राज्याच्या चारही उपविभागांमध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील तीन दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आज काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

विदर्भातसुद्धा आजपासून तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील चार दिवस विदर्भातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचसोबत कोकण, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील. या पावसामुळे या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावासामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला

आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -