दिवाळीला सुरुवात झालेली आहे. आज म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आहे. परंतु या दिवाळीवर पावसाचे सावट आलेले आहे. ते म्हणजे आता यंदाच्या दिवाळीत पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. हा पाऊस जास्त प्रमाणात पडणार नाही, परंतु रिमझिम स्वरूपात का होईना? हा पाऊस (Weather Update) येणार आहे.
त्यामुळे यावर्षी फटाके वाजवण्यावर थोडेफार नियंत्रण असणार आहे. दिवाळी आलेली आहे, रब्बी हंगाम सुरू झाला आहे. शेतीमध्ये शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिके काढण्यास सुरुवात देखील केलेली आहे. परंतु पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झालेले आहेत.
हवामान विभागाने वर्तवलेला अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात पावसाची(Weather Update) शक्यता आहे. 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रिमझिम स्वरूपात पाऊस पडणार आहे. त्यासोबतच कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पाऊस पडणार आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह 32 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, परभणी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान या ठिकाणी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस येत असल्याने लोकांमध्ये काहीशा प्रमाणात नाराजी देखील येणार आहे. त्याचप्रमाणे रब्बी हंगामामधील पिके काढणीस आल्याने शेतकऱ्यांना देखील या पावसाचा थोडाफार फटका बसू शकतो.