Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनचाहत स्वच्छतेच्या बाबतीत बेशिस्त? सलमानसमोरच विवियन श्रुतिकानं चाहतला घेरलं, सलमाननं कोणाची बाजू...

चाहत स्वच्छतेच्या बाबतीत बेशिस्त? सलमानसमोरच विवियन श्रुतिकानं चाहतला घेरलं, सलमाननं कोणाची बाजू घेतली?

एरवी घरात सारखे एकमेकांसोबत वादावादी सुरु असणारे चाहत पांडे आणि विवियन यांच्यात आता ‘विकेंड का वार’ मध्ये सलमानसमोरच खडाजंगी होणार आहे. आणि विशेष म्हणजे विवियनला श्रुतिकाही साथ देताना दिसतेय. बिगबॉस 18 च्या यंदाच्या विकेंड का वारमध्येही विवियन डिसेना आणि चाहत पांडे आणि श्रुतिका अर्जुन यांच्यासोबत वाक् युद्ध होताना दिसतंय. चाहतवर बाथरुम नीट वापरत नसल्याचा आरोप करत या दोघांनी चाहतला टार्गेट केल्याचं दिसलं. यावर चाहतनंही विवयन आणि त्याच्या ग्रूपला चांगलंच सुनावल्याचं दिसलं.

 

काय होणार विकेंड का वारमध्ये ?

कलर्स टीव्हीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान बिगबॉसच्या घरातल्या स्पर्धकांची शाळा घेताना दिसतोय. बिगबॉसचे घर दिवाळीनिमित्त सुंदर सजवण्यात आलं आहे. बेशिस्त व्यक्तीला प्रत्येकानं गिफ्ट द्यायचं आहे. सलमान सगळ्या स्पर्धकांना घरात कोण बेशिस्त असल्याचं विचारतो. तेंव्हा विवियन एका सेकंदाच्या आत चाहत पांडेचं नाव घेतो. यावेळी चाहतला कुठलाही फिडबॅक दिला तर ती त्यावर वेगळंच उत्तर देते असं विवियन म्हणाला. त्यावर चाहतही तुला कसं बोलायचं याच्या क्लासची गरज असल्याचं सांगत सुनावलं.

 

स्वच्छतेच्या बाबतीत चाहत बेशिस्त

 

स्वच्छतेच्या बाबतीत कोण सगळ्यात जास्त चाहत बेशिस्त असल्याचं एलिस आणि श्रुतिकानं सांगितलं. यावेळी श्रुतिकानं चाहतच्या वॉशरुम युज करण्याबाबत चाहतमुळे इतर सदस्यांना त्रास होत असल्याचं सांगितलं. चाहतला या बोलण्याचं वाईट वाटल्याचं दिसलं. यावेळी चाहतनंही सलमानला थेटच सांगितलं. बाथरुम टॉयलेट ही अतिशय खाजगी बाब आहे. विवियन श्रुतिकासह या स्पर्धकांची टीम एक सारखाच विचार करते. या सगळ्यांची उत्तरं सेम आहेत. असं सलमानला सांगितलं. त्यावर तोही म्हणाला, या सगळ्यांचे हावभावही सेमच दिसतायत…

 

विवियन डिसेनाचे श्रुतिकासोबतही भांडण

‘बिग बॉस 18’ चा आणखी एक प्रोमो आला आहे, ज्यामध्ये विवियन डिसेना आणि श्रुतिका कपवरून भांडत आहेत. यात विवियन श्रुतिकाला सांगतो की तिच्यात ऐकण्याची क्षमता नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -