Tuesday, November 12, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीत टेक्सटाईल पार्क उभारणार’; रोजगाराचा महापूर आणणार 

इचलकरंजीत टेक्सटाईल पार्क उभारणार’; रोजगाराचा महापूर आणणार 

इचलकरंजीच्या कापड उद्योग मोठा आहे. याला पाठबळ देण्यासाठी महायुती सत्तेत आल्यावर येथे टेक्सटाईल(political campaign) पार्कची उभारणी करू. त्यामुळे इचलकरंजीतील कापड निर्मिती व्यवसाय जागतिक स्तरावर पोहोचेल, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं ते भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते.

 

सभेला कर्नाटकातील आमदार शशिकला जोल्ले, हातकणंगले मतदारसंघाचे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार अशोक माने, राहुल आवाडे, जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, इचलकरंजी भाजप शहराध्यक्ष अमृत भोसले, पश्चिम महाराष्ट्र संघटन सरचिटणीस मकरंद देशपांडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

सभेत शहा यांचा चांदीची गदा, पुष्पहार आणि संत बाळू मामांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शहा म्हणाले, केंद्रामध्ये शरद पवार १० वर्षे मंत्री होते. त्यांना २००४ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्रासाठी फक्त एक लाख ९१ हजार कोटी आणता आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी(political campaign) यांनी २०१४ ते २०२४ या कालावधीत १० लाख १५ हजार ९१ कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. कारण देशातील प्रत्येक राज्य प्रगतिपथावर आले पाहिजे. देशातील प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावले पाहिजे, अशी भाजप आणि मित्रपक्षांची मानसिकता आहे.

 

ही महाविकास आघाडी नाही, तर महाविनाश आघाडी आहे. त्यांना भारतीय श्रद्धा, परंपरा, इतिहास याचा अभिमान नाही. ते जातीयवाद पसरवतात. राहुल गांधी संविधानाची खोटी प्रत दाखवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान करतात. शरद पवार अयोध्येत रामाच्या दर्शनाला गेले नाहीत. कारण त्यांना व्होट बँकेची भीती वाटली. आम्ही मात्र अयोध्येत राम मंदिर बांधले. राहुल गांधी आरक्षण संपवण्याची भाषा करतात. पण जोपर्यंत भाजप आणि मित्र पक्षाचे सरकार आहे तोपर्यंत कोणीही संविधान आणि आरक्षण यांना संपवू शकत नाहीत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -