झोमॅटोने आपला तोटा टाळण्यासाठी तसेच अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी एक भन्नाट फिचर आणले आहे.
या फिचरअंतर्गत आता लोकांना अगदी कमी पैशांत अन्न मिळू शकेल. या फिचरचे नाव फूड रेस्क्यू फिचर असे आहे
या फिचरअंतर्गत एखादी ऑर्डर कॅन्सल झाल्यास ती कॅन्सल झालेली फूड ऑर्डर आसपासच्या इतर ग्राहकांना दिसेल.
त्यानंतर ही ऑर्डर घेण्याचं ठरवल्यास ग्राहकांना ती अगदी कमी पैशांत दिली जाईल.
कॅन्सल केलेली ऑर्डर तीन किमी अंतरावर असलेल्या अन्य ग्राहकांना दिसेल. लोकांना ताजं जेवण मिळावं म्हमून हॉ ऑप्शन अवघ्या काही मिनिटांसाठी उपलब्ध असेल.