भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी मारुती सुझुकीची अनेक उत्कृष्ट वाहने विकली जातात. कंपनीने कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये नवीन जनरेशन मारुती सुझुकी डिझायर 2024 लॉन्च केली आहे.या वाहनात कोणत्या प्रकारची वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत? किती दमदार इंजिन देण्यात आले आहे. ते कोणत्या किंमतीला लॉन्च केले गेले आहे? चला जाणून घेऊया…
मारुती डिझायर 2024 लाँच
मारुती सुझुकीने भारतीय बाजारपेठेत कॉम्पॅक्ट सेडान कार विभागात नवीन जनरेशन मारुती डिझायर 2024 लॉन्च केली आहे. यामध्ये कंपनीने अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत. तसेच तिसऱ्या पिढीच्या डिझाईनच्या तुलनेत नवीन पिढीला अतिशय नवीन लूक देण्यात आला आहे.
काय आहेत वैशिट्ये ?
अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. यात नऊ इंची इन्फोटेनमेंट सिस्टीम, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कार प्ले, १६ इंची अलॉय व्हील, एलईडी डीआरएल, एलईडी लाईट्स, एलईडी फॉग लॅम्प,बॉडी कलर्ड बंपर, हाय माऊंट एलईडी स्टॉप लॅम्प, शार्क फिन अँटेना, फ्रंट फूटवेल इल्युमिनेशन, लेदर रॅप्ड स्टीयरिंग व्हील, ड्युअल टोन इंटिरियर्स, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, TPMS, सनरूफ, क्रूझ कंट्रोल, वायरलेस चार्जर, Push स्टार्टर स्टॉप, ऑटो हेडलॅम्प रियर एसी व्हेंट, डिजिटल एसी पॅनल, सुझुकी कनेक्ट यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्यात दोन ॲक्सेसरीज पॅकेजेसही देण्यात आल्या आहेत.
मारुती डिझायर 2024 ची लांबी
या गाडीची एकूण लांबी 3995 मिमी आहे. त्याची रुंदी 1735 मिमी ठेवण्यात आली आहे. मारुती डिझायर 2024 ची उंची 1525 मिमी आहे आणि त्याचा व्हीलबेस 2450 मिमी आहे. त्याचे ग्राउंड क्लीयरन्स 163 मिमी ठेवलेले आहे आणि 4.8 मीटरच्या टर्निंग त्रिज्यासह, याला सामानासाठी 382 लीटरची बूट जागा मिळते.
काय आहे किंमत ?
Dzire 2024 भारतीय बाजारपेठेत 6.79 लाख रुपयांच्या प्रास्ताविक एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे. याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 10.14 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी सबस्क्रिप्शनसह देखील देत आहे. कारची प्रास्ताविक किंमत 31 डिसेंबर 2024 पर्यंत वैध असेल.