चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कासी विश्वनाथन यांनी नुकतंच एमएस धोनीच्या फ्रँचायझीमधील भविष्याबाबत खुलासा केला आहे.चेन्नईला पाच वेळा विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार धोनी आयपीएलचा शेवटचा सामना कुठे खेळणार आहे, याबाबत हा खुलासा करण्यात आला आहे.
चेन्नई सुपर किंग्जने महेंद्र सिंह धोनीला या पर्वात अनकॅप्ड प्लेयर म्हणून रिटेन केलं आहे. यावेळी धोनीला फ्रेंचायझीकडून फक्त 4 कोटी मिळणार आहेत. पण फ्रेंचायझीला मोठा अनुभवी प्लेयरची साथ
आयपीएल 2025 पर्वात धोनी खेळणार हे निश्चित झालं आहे. पण पुढच्या पर्वाचं काय? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ म्हणाले की धोनी पुढे खेळेल की आयपीएल 2025 हा त्याचा शेवटचा हंगाम असेल हे अद्याप अनिश्चित आहे. मात्र धोनीने शेवटचा सामना चेन्नईत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
तुम्हाला माहिती आहे की, धोनी कधीच आपले प्लान कोणाला सांगत नाही. तो काय निर्णय घेणार हे अगदी शेवटच्या क्षणी कळतं. पण चेन्नई सुपर किंग्ससोबत असलेलं नातं पाहता त्याने शेवटचा सामना चेन्नईत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण सीएसकेला धोनी कायम खेळावा हीच इच्छा आहे.’, असं चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी सांगितलं.
सीएसके फ्रँचायझीने कर्णधार ऋतुराज गायकवाड (रु. 18 कोटी), मतिषा पाथिराना (रु. 13 कोटी), शिवम दुबे (रु. 12 कोटी) आणि रवींद्र जडेजा (रु. 18 कोटी) देत रिटेन केलं आहे. पाच खेळाडूंना कायम ठेवणाऱ्या सीएसकेने आपल्या पर्समधून 65 कोटी रुपये खर्च केले असून मेगा लिलावासाठी 55 कोटी आहेत.