अनेक खाजगी टेलिफोन कंपन्यांनी जुलै महिन्यामध्ये त्यांच्या रिचार्जच्या दरामध्ये वाढ केलेली होती. जीओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरात वाढ केलेली आहे.
ही वाढ जवळपास 22 टक्क्यांनी केलेली होती. त्यामुळे त्यांचे रिचार्ज प्लॅन्स खूप महाग झाले. आणि त्यानंतर त्यांचे ग्राहक देखील त्यांच्यावर नाराज होऊन अनेक ग्राहकांनी त्यांचे सीम देखील पोर्ट केले होते.
त्यानंतर आता जिओ तसेच इतर खाजगी टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना परत आणण्यासाठी आणि खुश करण्यासाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत आहेत. यामध्ये ते ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग इंटरनेट डाटा आणि एसएमएसचा लाभ देत आहेत. जर तुम्ही देखील जिओ युजर असाल आणि तुम्ही 84 दिवसांसाठी एक चांगला स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची ठरणार आहे. कारण जिओनी 489 रुपयांचा एक प्लॅन लॉन्च केलेला आहे. या प्लॅनमध्ये देशभरातील युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग तसेच फ्री नॅशनल रोमिंग दररोज 2 जीबी डाटा आणि 100 sms चा लाभ मिळणार आहे.
या रिचार्ज प्लॅन मध्ये जिओच्या ग्राहकांना 84 दिवसांमध्ये एकूण 168 जीबीचा डाटा मिळणार आहे. तसेच तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल, तर तुम्ही जिओच्या प्रोफाईल नेटवर्क मध्ये असाल, तर तुम्ही अनलिमिटेड डेटा वापरू शकता. या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाउड यांचे ॲक्सेस मिळू शकतात.
479 रुपयांचा प्लॅन | Jio Recharge Plan
जिओनी आणखी एक प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. या प्रीपेड प्लॅनची वैधता देखील 84 दिवसांची आहे. या प्रीपेड प्लॅनसाठी तुम्हाला 479 रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये देखील तुम्हाला अनलिमिटेड मोफत कॉलिंग, इंटरनेट डाटा तसेच 1000 मोफत एसएमएसचा लाभ मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला 6 जीबी हाय स्पीड डेटा मिळणार आहे.