Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञान5 वर्ष जुन्या फोनचा डिस्प्ले करा नवाकोरा, ‘ही’ सेटिंग करा

5 वर्ष जुन्या फोनचा डिस्प्ले करा नवाकोरा, ‘ही’ सेटिंग करा

वस्तू जुनी झाली तरी हरकत नाही. तुमच्या त्या जुन्या वस्तूची योग्य काळजी घेतली की ती अगदी नव्या वस्तूंसारखी उपयोगात येऊ शकते. कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तूंच्या बाबतीत हे लागू होतं. तुम्ही वस्तूंची काळजी घेतली की त्या वर्षानुवर्ष चांगल्या राहतात. आज आम्ही तुम्हाला जुन्या डिस्प्लेविषयी काही ट्रिक्स सांगणार आहोत.

 

आजच्या डिजिटल युगात तुम्ही टीव्ही पाहात असाल, लॅपटॉपवर काम करत असाल किंवा स्मार्टफोन वापरत असाल. तुम्हाला लक्षात येईल की, उत्तम डिस्प्ले क्वॉलिटीमुळे अनुभव सुधारतो. तुम्ही तुमच्या डिस्प्लेची गुणवत्ता सुधारण्याचे काही सोपे मार्ग वापरुन पाहू शकता. यामुळे तुमच्या स्क्रीनवर रंग, चमक आणि शार्पनेस अधिक चांगले दिसेल. जाणून घ्या.

 

डिस्प्लेची चमक आणि कॉन्ट्रास्ट सेट करा

स्क्रीनची ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट योग्य पातळीवर सेट करणे महत्वाचे आहे. जास्त चमक डोळ्यांवर परिणाम करू शकते, तर खूप कमी चमक असल्यास डिस्प्ले फिकट दिसू शकतो. टीव्ही किंवा कॉम्प्युटरच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट बॅलन्स करा.

 

डिस्प्लेचा रंग सेट करा

चांगल्या रंगाच्या गुणवत्तेसाठी ‘कलर टेम्परेचर’ किंवा ‘कलर मोड’चा वापर करा. सहसा ‘विव्हिड’ किंवा ‘मूव्ही’ मोडमुळे रंग सेट होतात. आपल्या टीव्ही किंवा कॉम्प्युटरमध्ये ‘कस्टम कलर’ हा पर्याय निवडा आणि आपल्या आवडीनुसार सेटिंग करा.

 

डिस्प्लेचे रिझॉल्यूशन वाढवा

डिस्प्लेचे रिझॉल्यूशन जितके जास्त असेल तितके फोटो आणि व्हिडिओ शार्प आणि स्पष्ट दिसतील. टीव्ही, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर उपलब्ध असलेले सर्वोच्च रिझोल्यूशन सेट करा. आजकाल बहुतेक डिव्हाईसमध्ये फुल HD आणि 4K रिझॉल्यूशनचा पर्याय असतो, जो चांगल्या डिस्प्लेसाठी योग्य आहे.

 

एचडीएमआय केबलचा वापर करा

 

एचडीएमआय केबलच्या गुणवत्तेचा परिणाम डिस्प्लेवर होतो. चांगल्या प्रतीची एचडीएमआय केबल वापरा, विशेषत: जर आपल्याला 4K डिस्प्लेचा अनुभव घ्यायचा असेल तर. एचडीएमआय जुन्या व्हीजीए किंवा इतर केबल्सपेक्षा डिस्प्ले आणि साउंड क्वालिटी सुधारते.

 

ब्लू लाईट फिल्टर वापरा

डिजिटल स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश डोळ्यांवर परिणाम करू शकतो. ब्लू लाईट फिल्टर वापरा, जे स्क्रीनच्या गुणवत्तेवर परिणाम न करता डोळ्यांचे संरक्षण प्रदान करतात. हे फीचर सहसा स्मार्टफोन आणि लॅपटॉपमध्ये उपलब्ध असते. आम्ही दिलेल्या या टिप्स तुमच्या जुन्या डिस्प्लेची कॉलिटी सुधारू शकतात. तसेच तुम्ही पाहत असलेला व्हिडिओ, चित्रपटाचा तुम्हाला आनंद घेता येईल. त्यामुळे या टिप्स नक्की वापरा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -