Tuesday, April 29, 2025
Homeमहाराष्ट्रनोव्हेंबर महिन्यात सलग सुट्ट्या ; शेअर बाजार आणि बँकांचे आर्थिक व्यवहार ठप्प

नोव्हेंबर महिन्यात सलग सुट्ट्या ; शेअर बाजार आणि बँकांचे आर्थिक व्यवहार ठप्प

जागतिक परिस्थिती आणि आर्थिक स्थिती या बाबी लक्षात घेऊनच गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक करावी . त्याचसोबत मार्केटचा परिपूर्ण अभ्यास असणेही महत्वाचे असते. सध्याच्या घडीला शेअर मार्केटमध्ये मोठे चढ उतार पाहण्यास मिळत आहेत. त्यातच या आठवड्यात शेअर बाजार आणि बँकांना तीन दिवस सुट्ट्या असणार आहेत . तरी याबाबतची सर्व माहिती ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांना असणे गरजेचं आहे. तर आज आपण कोणत्या दिवशी बँका आणि शेअर बाजाराला सुट्ट्या असतील याची माहिती बघणार आहोत.

 

सार्वजनिक सुट्टी जाहीर

गुरु नानक जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर 2024 रोजी देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या दिवशी शेअर बाजार आणि बँका बंद असणार आहेत . त्याचबरोबर 16 नोव्हेंबर रोजी शनिवार असल्यामुळे शेअर मार्केट बंद राहील . 17 नोव्हेंबरला रविवारामुळे बँका आणि शेअर बाजार बंद राहील . 20 तारखेला विधानसभा मतदानामुळे बँकांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत . म्हणजेच शेअर बाजाराला सलग तीन दिवस 15 नोव्हेंबरपासून 17 नोव्हेंबरपर्यंत सुट्ट्या राहतील तसेच बँकांना 15, 17 आणि 20 ला सुट्टी असणार आहे.

 

कोणत्या भागातील बँका बंद

शुक्रवारी 15 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र, मिझोरम, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, चंदिगड, नागालँड, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, हैदराबाद, जम्मू, तेलंगाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, नवी दिल्ली, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, आणि श्रीनगर या भागातील बँका बंद राहतील. त्यामुळे या भागातील नागरिकांना आपल्या बँकिंग कामकाजाचे नियोजन 16 नोव्हेंबरनंतर करावे लागणार आहेत. तसेच सुट्ट्याचे दिवस बघून त्याआधी कामे करावीत .

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -