2024 साठी राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान झालं आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला (Voting) सुरुवात झाली आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 32.18 टक्के मतदान झाले आहे. जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झाले.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी
अहमदनगर – ३२.९० टक्के,
अकोला – २९.८७ टक्के,
अमरावती – ३१.३२ टक्के,
औरंगाबाद- ३३.८९ टक्के,
बीड – ३२.५८ टक्के,
भंडारा- ३५.०६ टक्के,
बुलढाणा- ३२.९१ टक्के,
चंद्रपूर- ३५.५४ टक्के,
धुळे – ३४.०५ टक्के,
गडचिरोली-५०.८९ टक्के,
गोंदिया – ४०.४६ टक्के,
हिंगोली -३५.९७ टक्के,
जळगाव – २७.८८ टक्के,
जालना- ३६.४२ टक्के,
कोल्हापूर- ३८.५६ टक्के,
लातूर _ ३३.२७ टक्के,
मुंबई शहर- २७.७३ टक्के,
मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,
नागपूर – ३१.६५ टक्के,
नांदेड – २८.१५ टक्के,
नंदुरबार- ३७.४० टक्के,
नाशिक – ३२.३० टक्के,
उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,
पालघर-३३.४० टक्के,
परभणी-३३.१२टक्के,
पुणे – २९.०३ टक्के,
रायगड – ३४.८४ टक्के,
रत्नागिरी-३८.५२ टक्के,
सांगली – ३३.५० टक्के,
सातारा -३४.७८ टक्के,
सिंधुदुर्ग – ३८.३४ टक्के,
सोलापूर – २९.४४,
ठाणे -२८.३५ टक्के,
वर्धा – ३४.५५ टक्के,
वाशिम – २९.३१ टक्के,
यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.
सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरात
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत सर्वात कमी मतदान हे मुंबई शहरात झाले आहे. मुंबई शहरात फक्त 27.73 टक्के मतदान झाले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत तमतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यामुळं यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. लोक हळूहळू मतदानासाठी बाहेर पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला गडतिरोली जिल्ह्यात आत्तापर्यंत सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 50.89 टक्के मतदानाची नोदं झाली आहे. मतदानाच्या बाबतीत आत्तापर्यंत गडचिरोली जिल्ह्यानं मोठी आघाडी घेतली आहे. दरम्यान, यासंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यामुळं यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.