Tuesday, December 24, 2024
Homeमहाराष्ट्रलोन अप्लिकेशन रिजेक्ट होण्यापासून वाचवा ; ‘हे’ उपाय करून मिळावा त्वरित कर्ज

लोन अप्लिकेशन रिजेक्ट होण्यापासून वाचवा ; ‘हे’ उपाय करून मिळावा त्वरित कर्ज

आज प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पैशाची गरज भासत असते. त्यासाठी बँकांकडे लोन अर्ज करत असतात. पण कित्येकदा त्यांचे लोन अर्ज नाकारले जातात. त्यामुळे निराशजनक वातावरण निर्माण होते. पण याचा अर्थ असा नाही की, लोन मिळवण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. सर्वात आधी तुम्हाला तो अर्ज का रिजेक्ट झाला याची कारणे शोधावी लागतील. जर बँक किंवा एनबीएफसीने लोनचा अर्ज नाकारला असेल, तर त्यांना याचे कारण सांगणे आवश्यक असते. विशेषतः बँका कमी क्रेडिट स्कोअर, कमी उत्पन्न, आधीच्या कर्जाचा जास्त भार किंवा अपुरी क्रेडिट हिस्ट्री यांसारख्या कारणांमुळे लोन अर्ज नाकारतात.

 

खराब क्रेडिट स्कोअर –

तुमच्या खराब क्रेडिट स्कोअरमुळे तुमचा अर्ज नाकारला जातो. जर तुमचा अर्ज खराब क्रेडिट स्कोअरमुळे नाकारला गेला असेल, तर सर्वात प्रथम त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही CIBIL आणि Equifax यांसारख्या क्रेडिट स्कोअर एजन्सीकडून तुमचा क्रेडिट रिपोर्ट मिळवू शकता. हा स्कोर सुधारण्यासाठी तुम्ही वेळेवर हप्ते भरणे आवश्यक असते. खराब क्रेडिट स्कोअर होण्याची काही कारणे आहेत, त्यामध्ये हप्ते वेळेवर न भरणे, उधारीची जास्त रक्कम असणे , जास्त क्रेडिट कार्ड्स वापरून बिल न भरणे , क्रेडिट रिपोर्टमध्ये चुकीची माहिती असणे. तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी हप्ते वेळेत भरणे, अनावश्यक खर्च टाळणे, आणि आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे.

 

विनाकारण कर्जासाठी चौकशी टाळावी –

 

बर्‍याच लोकांना क्रेडिट कार्डचा जास्त वापर करण्याची सवय असते. 30% Credit Utilization Ratio आदर्श मानला जातो. तसेच अनेक कर्जासाठी अर्ज करण्याचा परिणाम देखील तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो. कर्जासाठी केलेल्या प्रत्येक चौकशीचा प्रभाव क्रेडिट स्कोअरवर पडतो. म्हणून विनाकारण कर्जासाठी चौकशी टाळावी. जर कर्जाची गरज असेल तर विचारपूर्वक एका बँक किंवा एनबीएफसीकडे अर्ज करा. यामुळे तुमचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही वाईट परिणाम होत नाही.

 

750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर –

तुमचा 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो. बँका आणि एनबीएफसी 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना लगेच कर्ज देतात. बँका आणि एनबीएफसी ग्राहकाच्या DTI रेशो विचारात घेतात. DTI वरून व्यक्तीच्या आर्थिक स्थैर्याचा अंदाज येतो. जास्त DTI रेशो आदर्श मानला जात नाही. DTI जास्त असल्याचा अर्थ तुमच्या उत्पन्नाचा जास्त भाग कर्ज फेडण्यासाठी वापरला जातो. बँका आणि एनबीएफसी 40% पेक्षा कमी DTI रेशो आदर्श मानतात.

 

सहज कर्ज मिळू शकते –

 

जर तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारला असेल , तर तुम्ही पुन्हा कर्जासाठी अर्ज करू शकता. बँकांचे किंवा एनबीएफसीचा मुख्य उद्देश कर्ज देणे हाच असतो. कर्जावरील व्याज हा त्यांचा उत्पन्नाचा भाग आहे. त्यामुळे बँका आणि एनबीएफसीचा पहिला प्रयत्न कर्ज अर्ज मंजूर करणे हा आहे. पण काही वेळा मोठया कारणास्तव अर्ज फेटाळले जातात . मात्र त्यात तुम्ही सुधारणा केल्यास तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -