बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-2025 स्पर्धेत टीम इंडियाची कसोटी लागणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात भिडणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत उपकर्णधार जसप्रीत बुमराह भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. पहिला सामना हा पर्थ येथे 22 नोव्हेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाच्या गोटात युवा खेळाडूची एन्ट्री झाली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
देवदत्त पडीक्कल याचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्मा उपलब्ध नाही, तर शुबमन गिल दुखापतीमुळे सामन्यात खेळणार नाहीय. त्यामुळे देवदत्त पडीक्कल याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. देवदत्त पडिक्कल इंडिया एमध्ये होता. देवदत्त पडिक्कल ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियातच थांबून होता. त्यानंतर आता देवदत्तचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
कोणत्या स्थानी संधी?
दरम्यान रोहित आणि शुबमन हे दोघेही पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे देवदत्तला ओपनिंगला पाठवणार की तिसऱ्या स्थानी बॅटिंगची संधी दिली जाणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, एलेक्स कॅरी, मार्नस लाबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, जॉश इंग्लीश आणि जॉश हेझलवुड