Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रअंतराळातील 8 दिवसांचा मुक्काम 160 दिवसांवर, सुनीता विल्यम्सच्या त्या व्हायरल फोटोमुळे चिंता...

अंतराळातील 8 दिवसांचा मुक्काम 160 दिवसांवर, सुनीता विल्यम्सच्या त्या व्हायरल फोटोमुळे चिंता वाढली, प्रकृतीबाबत मोठी अपडेट

अंतराळवीर सुनीता विल्सम्स आणि त्यांचे सहकारी विल्यम्स बुच यांना स्पेस स्टेशनमध्ये जाऊन तब्बल सहा महिने झाले आहेत. मात्र अजूनही ते पृथ्वीवर परतू शकलेले नाहीत. या इंटरनॅशनल स्पेस स्थानकाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी सुनीता विलम्स यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता, ज्यामध्ये सुनीत विलम्स यांची तब्येत खूपच बारीक झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता या दोन्ही अंतराळवीरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सोबतच नासाच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार स्पेस स्टेशनमध्ये आता पाणी उपलब्ध नसल्यानं आपली लघवी आणि घामाचं रुपांतर पाण्यात करून ते पिण्याची वेळ या दोन अंतराळवीरांवर आली आहे. मात्र नासाकडून त्यांना पाण्याचा पुरवठा देखील केला जात नाहीये.

 

अंतराळ यानामध्ये झालेल्या काही तांत्रिक बिघाडामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच यांचा स्पेस स्टेशनमधील मुक्काम दिवसेंदिवस वाढतच आहे. सुरुवातीला ते अंतराळात फक्त आठ दिवसांच्या मोहिमेसाठी गेले होते. मात्र आता त्याला तब्बल 160 दिवस झाले आहेत, ते अजूनही पृथ्वीवर परतू शकलेले नाहीत. ज्याचा त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. नासाकडून वारंवार स्पेस स्टेशनची अपडेट घेण्यात येत आहे. सुनीता विल्सम यांच्याकडे खाण्यासाठी सध्या झींगा कॉकटेल, पिज्जा आणि अशा अनेक पदार्थांचे पर्याय आहेत, मात्र त्यांना ताजे अन्न मिळू शकत नाहीये.

 

न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकार्यांचा मुक्काम वाढत चालला आहे. अशा स्थितीमध्ये पाण्याच्या बचतीकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. त्यामुळे सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी लघवी आणि घामाचे पाण्यात रुपांतर करून ते पित आहेत. तसेच ज्या अन्नासाठी पाण्याची आवश्यक नाही असं अन्न खाण्याच्या सूचना देखील त्यांना देण्यात आल्या आहेत. 25 सप्टेंबरला एक फोटो व्हायर झाला होता, ज्यामध्ये सुनीत विल्यम्स आपल्या सहकाऱ्यांसोबत पिझ्झा खाताना दिसत आहे, मात्र त्यांची प्रकृती ही खूप रोडावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -