Thursday, December 5, 2024
Homeराजकीय घडामोडीविधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सर्वात लक्षवेधी बॅनर, चर्चा तर होणारच?

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सर्वात लक्षवेधी बॅनर, चर्चा तर होणारच?

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. महाविकास आघाडीचा पराभव झाला. ठिकठिकाणी विजयी उमदेवाराचे बॅनर लागले आहे. परंतु पराभूत उमेदवारांचे अनोखे बॅनर नवी मुंबईत लागले आहे. या बॅनरमध्ये हा तांत्रिक पराभव आहे, जनतेच्या मनातील खरा आमदार, डमी उमेदवार आणि प्रतिकात्मक चिन्हास जास्त मते मिळाल्याचे दाखवून दिले आहे. बेलापूर विधानसभा मतदार संघामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक यांचा 377 मतांनी पराभव झाल्यामुळे त्यांचे अनोखे बॅनर लागले आहे. त्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

 

 

काय आहे त्या बॅनरमध्ये

जनतेच्या मनात बेलापूर आमदार हे फक्त संदीप नाईकच आहे, अशी चर्चा बेलापूर विधानसभेत रंगली आहे. पिपाणी सारखे चिन्ह व संदीप नाईक यांच्या नावाचा डमी उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा केला गेला होता. त्यामुळे संदीप नाईक यांना मिळालेली काही मते विभागली गेली आहे. त्यांचा 377 मतांनी पराभव झाला. मात्र हा पराभव नसून महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांचा विजय आहे. जनतेच्या मनात तेच आमदार आहे, असे बॅनर नवी मुंबईत झळकले आहेत.

 

असे मांडले गणित

संदीप नाईक यांना 91,475 मते मिळाली आहेत. डमी उमेदवारास 513 मते मिळाली आहे. पिपाणी चिन्हासारखे दिसणाऱ्या चिन्हाला 2860 मते मिळाली आहे. या सर्वांची बेरीज केली तर 94,830 मते होतात. ती मते विजयी उमेदवारापेक्षा जास्त आहे, असा दावा बॅनरच्या माध्यमातून विजय वाकुंज यांनी केला आहे. त्यांनी नवी मुंबईत अनेक ठिकाणी हे बॅनर लावले आहे. त्याची चर्चा रंगली आहे.

 

नागपुरात देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग्स

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर त्यांच्या नागपुरातील घराबाहेर होर्डिंग्स लागले आहेत. ‘महाविजयाचे शिल्पकार’ अशा आशयाचे होर्डिंग्स फडणवीस यांच्या खाजगी निवासस्थानाबाहेर लागले आहे. २० फुटांचे भले मोठे होर्डिंग्ज लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्रात भाजपला आजपर्यंतचे सर्वाधिक मोठे यश मिळाले. या यशात फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे महाविजयाचे शिल्पकार फडणवीस असल्याचे होर्डिंग्स लावण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -