Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रस्थळ दिल्ली, मध्यरात्रीचे 12.40 अन्..; असा ठरला मुख्यमंत्री, वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरी

स्थळ दिल्ली, मध्यरात्रीचे 12.40 अन्..; असा ठरला मुख्यमंत्री, वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरी

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर झालं नसलं तरी दिल्लीनं मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवल्याची खात्रीलायक माहिती झी 24 तासच्या हाती आली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं ठरवल्याची माहिती समोर आली आहे.

 

देवेंद्र फडणवीसांच्या नावावर कसं शिक्कामोर्तब झालं याची झी 24 तासच्या हाती आलेली ही इनसाईड स्टोरी…

 

दिल्लीत ठरला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?

मोदी-शाहांच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब?

मुख्यमंत्री ठरल्याची इनसाईड स्टोरी झी 24 तासवर

 

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे अजून जाहीर झालेलं नाही. मात्र पडद्यामागं बऱ्याच घडामोडी घडू लागल्यात. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची राजधानी दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती झी 24 तासच्या हाती आली आहे. दिल्लीश्वरांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती दिल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे.

 

स्थळ- नवी दिल्ली

मध्यरात्री 12.40 मिनिटं

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत बैठक सुरु झाली.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा यावर चर्चा सुरु झाली

बैठकीत संघाच्या वरिष्ठ नेत्यांचाही सहभाग होता

नेतृत्व कुणाकडं सोपवावं यावर सखोल चर्चा झाली

मुख्यमंत्रिपदासाठी एकदोन मराठा नेत्यांच्या नावांचाही विचार झाला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नेते असल्याचं सगळ्यांचं मत पडलं

संघाच्या नेत्यांनीही देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती दिली

 

दिल्लीतल्या या बैठकीत काही नावांवर चर्चा झाली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संघाच्या नेत्यांची पहिली पसंती देवेंद्र फडणवीस हेच राहिले. मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांचं नावच योग्य असल्याचा निष्कर्ष या नेत्यांनी काढल्याचं सांगण्यात येतंय.

 

अमित शाह आणि मोदींची ही चर्चा सुरु असतानाच एकनाथ शिंदेंचा मुंबईतून फोन आला. एकनाथ शिंदेंनीही भाजपनं मुख्यमंत्री ठरवावा आपण पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली.

 

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावालाच दिल्लीतील भाजप वर्तुळात पहिली पसंती मिळालीय. दिल्लीतून नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना हिरवा कंदिल मिळालाय. आता उत्सुकता आहे फक्त औपचारिक घोषणेची.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -