आज भारतासह जगभरातील कोट्यवधी लोक व्हॉट्सॲपचा वापर करतात. युजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी कंपनी नवनवीन फीचर्स ही सादर करत असते. नुकतेच व्हॉट्सॲप कंपनीने व्हॉइस नोटसाठी एक खास ट्रान्सक्राइब फीचर आणले आहे, जिथून तुम्ही कोणताही व्हॉईस मेसेज एका क्लिकवर ऐकण्याऐवजी वाचू शकता. दरम्यान, कंपनीने आता ॲपच्या चॅट सेक्शनमध्ये मोठा बदल केला आहे. वास्तविक कंपनीने एक नवीन टायपिंग इंडिकेटर सादर केला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर
व्हॉट्सॲपने त्यांच्या युजर्ससाठी ॲपमध्ये एक नवीन टायपिंग इंडिकेटर रोलआउट केले आहे, ज्याचे युजर्सने आयफोनच्या आयमेसेज ॲपसारखेच असल्याचं दिसणार आहे. या नवीन फीचर्समध्ये तीन बिंदूंचा ॲनिमेटेड चॅट बबल टायपिंग इंडिकेटर म्हणून दिसणार आहे. हे इंडिकेटर चॅट स्क्रीनच्या खालच्या बाजूला दिसणार आहे. हा बदल काही आठवड्यांपूर्वी अँड्रॉइड युजर्सच्या लक्षात आला होता आणि आता तो आयफोनवरही रोलआउट करण्यात आला आहे.अनेक युजर्सनी या वीन फीचर्सला डिसलाइक करत त्रासदायक असल्याचं म्हटलं आहे.
तर एका युजरने म्हटले आहे की, “हे सारखं वर-खाली होत राहत आणि खूप त्रासदायक आहे. तसेच एका दुसऱ्या यूजर्सने ”व्हॉट्सॲप आधीच खराब होते आणि हे अपडेट देखील काही कामाचं नाहीये,” असे सांगितले.तर एका युजरने या अपडेटनंतर सकारात्मक प्रतिक्रिया देत ‘टायपिंग इंडिकेटर खाली आणल्याचं कमी हे योग्य केलं’ असे सांगितले. व्हॉट्सॲपने या नव्या फीचरबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे युजर्सच्या फीडबॅकनंतर कंपनी हे फीचर कायम ठेवते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याआधी कंपनीने ॲपच्या स्टेटस सेक्शनलाही रिडिझाइन केले होते. ज्याला लाखो युजर्सनी लाइक केले होते.