Friday, December 27, 2024
Homeराजकीय घडामोडीनवीन सरकारच्या शपथविधीची तारीख ठरली, या ठिकाणी होणार शपथविधी सोहळा?

नवीन सरकारच्या शपथविधीची तारीख ठरली, या ठिकाणी होणार शपथविधी सोहळा?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरील सस्पेंस अनेक दिवस कायम होता. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. महाराष्ट्राचे विद्यमान कार्यवाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना आधीच पाठिंबा दिला आहे. त्यानंतर नवीन मंत्रिमंडळात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील अशी चर्चा सुरु आहे. पण एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नाहीत अशीही चर्चा आहे.

 

कधी होणार शपथविधी?

कालच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर आता नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवीन सरकार कधी स्थापन होणार अशी चर्चा सुरु आहे. त्यात आता ही माहिती समोर आली आहे. नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळेल हे देखील उत्सूकतेचं ठरणार आहे. कारण चर्चा अशी ही आहे की, काही नवीन लोकांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते.

 

उदय सामंत म्हणाले की, दिल्लीत सकारात्मक चर्चा झाली आहे. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करणार असून, त्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा निर्णय होणार आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. तेव्हा चांगलीच चर्चा रंगली. बैठक झाली पाहिजे. पण बैठकीतून चांगला निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. केंद्रीय नेतृत्वाने जो काही निर्णय घेतला आहे ते केंद्रीय नेतृत्व आणि शिंदे साहेबांना माहीत आहे.

 

उपमुख्यमंत्री होणार की नाही हे शिंदे साहेब ठरवतील. उदय सामंत हे उपमुख्यमंत्री होणार यात तथ्य नाही. शिंदे साहेब सरकारमध्ये राहावेत अशी आमची इच्छा आहे. शिंदे साहेब अस्वस्थ आहेत, नाराज़ नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फुल बहुमत आहे. गृहमंत्री पदाबाबत कोणताही वाद नाही. EVM मध्ये समस्या होती तर महाविकास आघाडीचे आमदारही विजयी झाले नसते.

 

दुसरीकडे नवीन सरकार स्थापनेला वेळ लागत असल्याने विरोधकांनी महायुतीवर टीका करायला सुरुवात केली आहे. बहुमत असून पण सराकार का स्थापन होत नाही असा सवाल महाविकासआघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -