Wednesday, December 4, 2024
Homeतंत्रज्ञानजिओचा ८४ दिवसांचा प्लॅन, दरमहा ₹१६० मध्ये अनलिमिटेड कॉलिंग!

जिओचा ८४ दिवसांचा प्लॅन, दरमहा ₹१६० मध्ये अनलिमिटेड कॉलिंग!

बीएसएनएल, एअरटेल, व्हीआय यांच्या ऑफर्समध्ये आता जिओनेही एक धमाकेदार ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर ८४ दिवसांच्या वैधतेची आहे. यामध्ये अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, १००० एसएमएस आणि इतरही अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

 

रिलायन्स जिओने अनेक वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, डेटा, मोफत ओटीटी प्लॅटफॉर्म प्लॅन्स जाहीर केले आहेत. यापैकी ८४ दिवसांचा म्हणजेच जवळपास ३ महिन्यांच्या वैधतेचा प्लॅन आहे. दरमहा फक्त १६० रुपये भरून अनलिमिटेड कॉलिंग, मोफत डेटा आणि इतरही सुविधा या प्लॅनमध्ये मिळतील.

 

जिओच्या ८४ दिवसांच्या प्लॅनची रिचार्ज किंमत ४७९ रुपये आहे. म्हणजेच दरमहा १६० रुपये खर्च येईल. कॉलिंग, डेटा सोबतच जिओ टीव्ही, सिनेमा आणि इतरही सुविधा या प्लॅनमध्ये ग्राहकांना मिळतील. या बजेट फ्रेंडली रिचार्ज प्लॅनमधील सुविधांची माहिती येथे दिली आहे.

 

४७९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये जिओ ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देत आहे. यामध्ये स्थानिक आणि एसटीडी कॉल कुठल्याही नेटवर्कवर मोफत करता येतील. हा प्लॅन प्रामुख्याने कॉलिंग आणि वैधतेसाठी आहे. त्यामुळे यात एकूण ६ जीबी डेटा मोफत मिळेल. मोफत डेटा संपल्यानंतर स्पीड ६४ केबीपीएस होईल.

 

८४ दिवसांच्या कालावधीत १००० एसएमएस मोफत मिळतील. यासोबतच मोफत जिओ अ‍ॅप्सचा वापर, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा (नॉन-प्रीमियम) आणि जिओ क्लाउडची सुविधा मिळेल. जिओ अ‍ॅप आणि जिओ पोर्टलवरून हा ८४ दिवसांचा प्लॅन रिचार्ज करता येईल.

 

जिओच्या ८४ दिवसांच्या प्लॅनमध्ये जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी जिओने एक नवीन प्लॅन जाहीर केला आहे. १०२९ रुपये रिचार्ज केल्यास ८४ दिवसांची वैधता आणि १६८ जीबी डेटा मोफत मिळेल. दररोज २ जीबी डेटा वापरता येईल. ही मर्यादा संपल्यानंतर डेटा स्पीड ६४ केबीपीएस होईल.

 

या प्लॅनमध्येही अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ क्लाउड आणि इतरही सुविधा मिळतील. स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी जिओने अनेक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. आता नवीन वर्षासाठी जिओ आणखी ऑफर्स जाहीर करण्याच्या तयारीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -