Thursday, February 6, 2025
Homeराजकीय घडामोडीमहाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा, कुठे, किती वाजता पाहाल? फक्त एक क्लिक...

महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा, कुठे, किती वाजता पाहाल? फक्त एक क्लिक आणि…

महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज मुंबईत पार पडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले होते. त्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे भाजप महायुतीचा मुख्यमंत्री विराजमान होणार हे निश्चित झाले आहे. त्यातच काल भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. हा शपथविधी सोहळा कुठे, कधी आणि किती वाजता पाहता येणार याची माहिती आपण जाणून घेऊया

 

शपथविधी सोहळा कुठे?

महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी ५ डिसेंबर २०२४ रोजी पार पडणार आहे. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. यासाठी जय्यत तयारीही सुरु आहे. आझाद मैदानात 30 हजारपेक्षा जास्त नागरिक बसतील एवढा मोठा मंडप बांधला जात आहे. तसेच आझाद मैदानावर 100 बाय 100 चं मुख्य स्टेज उभारण्यात येत आहे. त्याच्या बाजूला दोन स्टेज बांधण्यात येत आहे. हा संपूर्ण स्टेज आणि मंडप भगव्या रंगाचे असणार आहे. या सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि देशातील सर्वच राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

 

शपथविधी सोहळा किती वाजता?

महाराष्ट्रातील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याला आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतील. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळेमुळे कार्यक्रमाचं स्वरूप संक्षिप्त करण्यात आलं आहे. तर इतर मंत्र्यांचा शपथविधीदेखील लवकरच पार पडेल. मुंबईतील राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे.

 

भव्य शपथविधीसाठी कोणा-कोणाला आमंत्रण?

या शपथविधीसाठी एनडीएशासित राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण करण्यात आलं आहे. या शपथविधीच्या या ग्रँड सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शपथविधीच्या सोहळ्यासाठी साधू-महंत, कलाकार, साहित्यिक यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -