Wednesday, December 11, 2024
Homeब्रेकिंगपुष्पा 2’ ला मोठा फटका, रिलीज झाल्यानंतर काही तासांतच ऑनलाईन लिक? 

पुष्पा 2’ ला मोठा फटका, रिलीज झाल्यानंतर काही तासांतच ऑनलाईन लिक? 

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘पुष्पा 2: द रूल’ आज रिलीज झाला असून अनेकांना तो पाहण्याची उत्सुकता आहे. मात्र प्रदर्शित झाल्यावर काही तासांतच या चित्रपटाला मोठा झटका बसला आहे. कारण रिलीज झाल्यानंतर काही वेळातच हा पिक्चर ऑनलाईन लीक झाला आहे. या चित्रपटाच्या तिकिटाची किंमत गगनाला भिडलेली असताना काही वेबसाईटवर मोफत उपलब्ध झाल्याने चित्रपटाचे नुकसान होऊ शकते. दरम्यान, हा चित्रपट काही वेबसाईटवर लीक झाल्याची माहिती आहे.

 

 

‘पुष्पा’च्या अ‍ॅक्शनने सिनेरसिकांना इतकी भुरळ घातली की त्याच्या अनेक क्लिप्स सोशल मीडियावर बेछूट शेअर केल्या जात होत्या. पुष्पा राजच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा अल्लू अर्जुन यावेळीही अप्रतिम कामगिरी केली आहे. पुष्पाची पत्नी श्रीवल्लीच्या भूमिकेत रश्मिका मंदानाने देखील पुनरागमन केले आहे. पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन वर्षांनी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर उतरला आहे. या चित्रपटाचे मोठ्या थाटामाटात स्वागतही केले जात आहे. चित्रपटगृहांपासून सोशल मीडियापर्यंत लोक या चित्रपटाची चर्चा करत आहेत.

 

सकाळी 8 वाजेपर्यंत या चित्रपटाने 21.04 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

पुष्पा 2 ऑनलाईन लीक

 

‘पुष्पा 2: द रूल’ हा चित्रपट लॉन्च होताच लीक झाला आहे. हा चित्रपट अनेक पायरसी वेबसाईट्सवर लीक झाला आहे.

 

‘पुष्पा 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक सुकुमार यांनी केले आहे. सुकुमार यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या चित्रपटांनी नेहमीच धुमाकूळ घातला आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक सुकुमार यांचा प्रत्येक चित्रपट लोकांच्या हृदयात आपलं खास स्थान निर्माण करतो. सुकुमार यांनी यापूर्वी अल्लू अर्जुनसोबत 3 चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि प्रत्येक वेळी अल्लू अर्जन सुकुमार यांच्यासाठी भाग्यवान किंवा खासच ठरला आहे.

 

बंगाली भाषेत प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट

 

‘पुष्पा 2: द रूल’ हा चित्रपट तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड, बंगाली आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. बंगाली भाषेतही प्रदर्शित होणारा हा पहिलाच अखिल भारतीय चित्रपट आहे. हा स्मार्टफोन स्टँडर्ड, 3D, IMAX, 4DX आणि D-BOX फॉरमॅटमध्ये रिलीज करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -