Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रआमिर खामनच्या 9 घरांवर चालणार बुलडोझर, घरं तोडण्याचं कारण काय?

आमिर खामनच्या 9 घरांवर चालणार बुलडोझर, घरं तोडण्याचं कारण काय?

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आता त्याच्या कोणत्या आगामी सिनेमामुळे नाही तर, त्याच्या प्रॉपर्टीमुळे चर्चेत आला आहे. आमिर खान त्याच्या कुटुंबियांसोबत मुंबईतील पाली हिल याठिकाणी राहतो. या परिसरात अभिनेत्याचं घर आहे. पण आता आमिर खानच्या घरावर बुलडोझर चारणार आहे. आमिरचं हे घर एका जुन्या बिल्डिंगमध्ये असून ही बिल्डिंग आता रिडेव्हलप होणार आहे. या बिल्डिंगच्या जागी आता अलिशान टॉवर उभा राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. बिल्डिंग रिडेव्हलपमेंटचं काम देखील आता सुरु झालं आहे.

 

सांगायचं झालं तर, आमिर खान ज्या बिल्डिंगमध्ये राहतो, त्या बिल्डिंगमध्ये 24 अपार्टमेंट आहे. त्यामध्ये 9 अपार्टमेंट आमिर खान याचे आहे. बिल्डिंग 40 वर्ष जुनी आहे. त्यामुळे . बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट होणार आहे. सोसायटीने Atmosphere Realty सोबत पार्टनरशिप केली आहे.

 

इमारतीच्या पुनर्विकास योजनेत आमिर खानचा पूर्ण सहभाग आहे. नवीन रचनेत तेथे राहणाऱ्या लोकांना 55 ते 60 टक्के अधिक क्षेत्रफळ असलेली घरे मिळणे अपेक्षित आहे. अपार्टमेंटच्या पुनर्विकासाची किंमत 80 हजार ते 1,25,000 रुपये प्रति चौरस फूट आहे.

 

आमिर खान याचे सिनेमे

आमिर खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमानंतर अभिनेता कोणत्याच सिनेमात दिसला नाही. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेव ठरला. सिनेमात अभिनेत्री करीना कपूर मुख्य भूमिकेत होती. पण सिनेमा अधिक कमाई देखील करु शकला नाही.

 

‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमानंतर आमिर खान याने ‘लापता लेडीज’ सिनेमाची निर्मिती केली. सिनेमात अभिनेता इन्स्पेक्टरची भूमिकाही साकारणार होता. मात्र सिनेमाचे दिग्दर्शक आणि आमिरची दुसरी पत्नी किरण राव हिने या भूमिकेत रवी किशनला कास्ट केलं.

 

आमिर खानचा आगामी सिनेमा

आमिर खान लवकरत ‘सितारे जमीन पर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. हा सिनेमा ‘तारे जमीन पर’ सिनेमाचा सिक्वल असणार आहे. आमिर खान सिनेमाची निर्मिती देखील करणार आहे. पण सिनेमाबद्दल अद्याप कोणती अधिकृत माहिती समोर आली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -