Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रईपीएफओचा यूएएनबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या

ईपीएफओचा यूएएनबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या

वेतनातून आणि कंपनीकडून दर महिन्याला ठराविक रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा केली जाते. पीएफ खात्यातील रक्कम ही पीएफधारक आणि त्याच्या कुटुंबियांसाठी गरजेच्या क्षणी फार कमी येते. भविष्यातील कोणत्याही चांगल्या-वाईट स्थितीत पीएफ खात्यातील रक्कम फार उपयोगी येते. घरासाठी, शुभ कार्यासाठी पीएफमधील रक्कम काढली जाते. ईपीएफओकडून पीएफधारकांसाठी अनेक सुविधा दिल्या जातात. तसेच ईपीएफओकडून सातत्याने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले जातात. आता ईपीएफओने असाच एक मोठा निर्णय घेतला आहे.

 

ईपीएफओने रोजगार संबंधित प्रोत्साहन (ELI) योजनेबाबत मोठा निर्णय घेतलाय. ईपीएफओने ईएलआय योजनेसाठी यूएएन नंबर लिंक करण्याची तारीख वाढवली आहे. ईपीएफओने 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. याआधी 30 नोव्हेंबर ही अंतिम तारीख होती. मात्र आता या योजनेच्या लाभार्थ्यांना 15 डिसेंबरपर्यंत यूएन नंबर लिंक करता येणार आहे. ईपीएफओने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

 

केंद्र सरकारकने 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात रोजगारासंदर्भातील योजनेच्या ए, बी आणि सी ची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत 2 लाख कोटी रुपयांच्या खर्चासह 5 वर्षांत 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य विकास आणि इतर संधी तयार करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.

 

ELI योजनेअंतर्गत 2 वर्षांत 2 कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्याचं लक्ष्य आहे. या योजनेतील प्लान ए नुसार, पहिल्यांदाच रोजगार मिळवून देण्यावर आणि EPF योजनेवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. प्लॅन बी नुसार, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नोकऱ्या निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. तर प्लॅन सीनुसार, नियोक्त्यांना समर्थन देण्यावर भर देण्यात येणार आहे.

 

ईपीएफओकडून 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

 

दरम्यान यूएएन एक्टीव्ह केल्याने पीएफधारकांना इतर सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आहे. त्यानुसार पीएफधारक त्यांच्या खात्यात किती रक्कम आहे? हे पाहू शकतात. तसेच पासबूक डाऊनलोड करु शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -