सध्या शेअर बाजारात चढउताराचे सत्र सुरू आहे. बाजारात जेव्हा विक्री सत्र सुरु होते. तेव्हा गुंतवणूकदार दोन पर्याय निवडतात. काही जण थोडाबहुत तोटा सहन करत स्टॉकची विक्री करतात. अथवा काहीजण दीर्घकाळासाठी हा स्टॉक होल्ड करून ठेवतात. ज्या शेअरचे फंडामेंटल दमदार आहेत. ते भविष्यात चांगला परतावा देऊन जातात. शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर मानण्यात येते. प्रवेग लिमिटेड या शेअरने हे सिद्ध केले आहे. गेल्या पाच वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. पाच वर्षांपूर्वी प्रवेग लिमिटेड या शेअरची किंमत 4.34 रुपये होती. आज हा शेअर 730 रुपये प्रति शेअर आहे. या दरम्यान शेअरने 15,700% असा बंपर रिटर्न दिला आहे.
असे तयार केले 1 लाखाचे 1 कोटी
कोणत्याही गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये पाच वर्षांपूर्वी केवळ एक लाख रुपयांच गुंतवणूक केली असती आणि शेअरची विक्री केली नसती तर आज त्याचा परतावा जवळपास 1.68 कोटी रुपये झाला असता. प्रवेग लिमिटेडने गेल्या पाच वर्षांत मोठी जोरदार कामगिरी केली. या तीन वर्षात हा शेअर चांगलाच चमकला. हा शेअर 139 रुपयांहून 730 रुपयांवर उसळला. या शेअरने या दरम्यान जवळपास 5.25 पट्टीत उसळी घेतली. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा शेअर मल्टिबॅगर ठरला आहे.
या वर्षात स्टॉकमध्ये घसरण
2024 मध्ये या स्टॉकमध्ये घसरण दिसून आली. पण दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी हा स्टॉक वरदान ठरला. YTD (Year to Date) च्या आकडेवारीनुसार, या शेअरमध्ये या वर्षात जवळपास 8% घसरण नोंदवण्यात आली. शॉर्ट टर्म घसरण दिसत असली तरी दीर्घकालीन गुंतवणुकीत या स्टॉकने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला. अशा स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यावर धैर्य ठेवणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. स्टॉक बजारात लाँगटर्म गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
मल्टिबॅगर स्टॉक कसा मिळवाल?
प्रवेग लिमिटेडने गुंतवणूकदारांना अवघ्या पाच वर्षात मालामाल केले. असे शेअर शोधण्यासाठी शेअरचा फंडामेंटल्स आणि कंपनीच्या प्रगतीचे आकलन केल्यावर तुम्हाला फायदा होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, कंपनीची आर्थिक स्थिती, आर्थिक प्रगती, कंपनीचे व्यवसायाचे मॉडेल आणि भविष्यातील संधी यावर लक्ष ठेवल्यास गुंतवणूकदारांना फायदा होतो. प्रवेग लिमिटेडचे हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे तज्ज्ञ मानतात. तसेच यासाठी गुंतवणूकदारांना जोखीम घेण्याची तयारी ठेवावी लागते.