Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रनोकरदारांना मोठा दिलासा; आता PF रक्कम ATM मधून कोणीही काढू शकणार

नोकरदारांना मोठा दिलासा; आता PF रक्कम ATM मधून कोणीही काढू शकणार

जे लोक नोकरी करतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनने (EPFO) आपल्या प्रणालीत मोठा बदल केला आहे. बऱ्याच लोकांना स्वतःच्या PF खात्यातून रक्कम काढताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते , हे टाळण्यासाठीच EPFO ने पीएफ रक्कम थेट एटीएमच्या माध्यमातून काढता येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अनेक नोकरदारांना मोठा दिलासा मिळालेला आहे. तर चला या निर्णयांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

 

कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची दखल –

सध्याच्या परिस्थितीमध्ये पीएफ रक्कम काढण्यासाठी अर्ज केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान 7 दिवसांचा कालावधी लागतो. त्यात अनेकदा तांत्रिक कारणांमुळे अर्ज नाकारला जाण्याची शक्यता असते. तसेच रक्कम खात्यात जमा होण्यासाठीही बराच वेळ लागतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून वारंवार तक्रारी येत होत्या, या तक्रारींची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

PF रक्कम एटीएम कार्डने काढता येणार –

 

आता EPFO 3.0 प्रणालीच्या माध्यमातून , सदस्यांना बँक खात्याप्रमाणे पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी एटीएम कार्ड वापरण्याची सोय दिली जाणार आहे. यासाठी पीएफ खाते, बँक खाते आणि एटीएम कार्ड एकमेकांशी जोडलेले असणे गरजेचे आहे . तसेच यामध्ये सुरुवातीला सदस्यांना त्यांच्या जमा रक्कमेच्या 50% रक्कम काढण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून दिला आहे.

 

 

वारसदार पीएफ रक्कम काढू शकणार –

 

या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा असा आहे कि , कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसदारांना एटीएमच्या माध्यमातून पीएफ खात्यातील रक्कम काढता येणार आहे. पण यासाठी वारसदारांचे खाते पीएफ खात्याशी जोडलेले असणे बंधनकारक आहे. याचसोबत Employees’ Deposit Linked Insurance योजनेअंतर्गत, मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला 7 लाख रुपयांपर्यंत विमा दावा करता येईल, जो एटीएमच्या मदतीने सुलभपणे मिळू शकेल.

 

सुविधा कर्मचाऱ्यांना जून 2025 पासून लागू –

 

या निर्णयाची घोषणा नोव्हेंबर 2024 मध्ये करण्यात आली होती . तसेच हि सुविधा कर्मचाऱ्यांना जून 2025 पासून लागू होईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. या नव्या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजांनुसार रक्कम काढणे सुलभ होणार आहे. EPFO 3.0 प्रणाली कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल सुविधा आणण्याचा मोठा टप्पा ठरणार आहे. यामुळे केवळ अर्ज प्रक्रियेतील अडचणी दूर होणार नाहीत, तर आर्थिक व्यवहारही वेगवान होताना दिसणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -