गेल्या आठवड्यात विशाल मेगा मार्ट आणि मोबिक्विक सारखे मोठे IPO बाजारात आले. या दोन्ही IPO ला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता या नवीन आठवड्यात 4 नवीन IPO बाजारात येणार आहेत.
ममता मशिनरी आणि ट्रान्सरेल लाइटिंगचे IPO मेनबोर्ड सेगमेंटमध्ये लॉन्च होणार आहेत. याशिवाय, NACDAC इन्फ्रास्ट्रक्चर आणि आयडेंटिकल ब्रेन स्टुडिओचे IPO SME विभागातील IPO खुले होणार आहेत. त्याचबरोबर 11 कंपन्यांचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ममता मशिनरी IPO
ममता मशिनरीचा IPO 19 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. हा 179 कोटी रुपयांचा IPO आहे. या IPO मध्ये 73,82,340 शेअर्सचा नवीन इश्यू केले जाणार आहेत. या IPO मधील प्राइस बँड 230 ते 243 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. IPO मध्ये एक लॉट 61 शेअर्सचा आहे. तुम्ही या IPO मध्ये 23 डिसेंबरपर्यंत पैसे गुंतवू शकता. या कंपनीचे शेअर्स 27 डिसेंबर रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट केले जाऊ शकतात. ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स 243 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत 75 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करताना दिसत आहेत. अशा प्रकारे शेअर 318 रुपयांवर 30.86 टक्के प्रीमियमसह लिस्ट केला जाऊ शकतो.
ट्रान्सरेल लाइटिंग IPO
ट्रान्सरेल लाइटिंगचा IPO 19 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल. या IPO मध्ये 400 कोटी रुपयांचे शेअर्स जारी केले जातील. त्याच वेळी, 10,160,000 शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत ठेवले जातील. कंपनीने अद्याप प्राइस बँड जाहीर केलेला नाही. हा IPO 23 डिसेंबरपर्यंत सबस्क्राइब करता येणार आहे. कंपनीचे शेअर्स 27 डिसेंबर रोजी स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्ट होऊ शकतात.
SME विभागात 2 IPO
NACDAC इन्फ्रास्ट्रक्चर आणि आयडेंटिकल ब्रेन स्टुडिओचे IPO SME विभागामध्ये लाँच होणार आहेत. NACDAC इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स 71.43 टक्के GMP वर व्यवहार करत आहेत. त्याच वेळी, 6 SME IPO ची लिस्टिंगदेखील केली जाणार आहे. त्यामुळे या सर्व IPO मधून गुंतवणूकदारांना चांगले पैसे कमावण्याची संधी आहे.