पुण्यातील जे लोक रोज बसने प्रवास करत असतात. त्या सगळ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता पुणे एसटी विभागात नव्याने 134 इलेट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना देखील आता प्रवास करायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. एसटी बस सेवा बंद झाल्यामुळे गाड्यांची संख्या देखील कमी झालेली होती. आणि त्यामुळेच प्रवाशांकडून नवीन इलेक्ट्रिक बसची मागणी करण्यात आली होती. प्रवाशांची ही मागणी मंजूर झालेली आहे. येत्या दोन महिन्यातच पुण्यामध्ये 134 इलेक्ट्रिक बस येणार आहेत. अशी माहिती देखील एसटी प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.
आजकाल वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने हवेमध्ये प्रदूषण देखील होत आहे. आणि हेच प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यावर अधिक भर देण्यात आलेला आहे. इतर अनेक खाजगी वाहने देखील इलेक्ट्रिक स्वरूपात आता उपलब्ध झालेली आहे. त्याचप्रमाणे एसटीच्या प्रवासाच्या तिकिटामध्ये सवलत दिल्याने प्रवाशी देखील वाढलेली आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांच्या संख्येतील असे दिवस वाढ होत चाललेली आहे. या सगळ्यात आता जर इलेक्ट्रिक बस आली तर प्रवाशांना चांगला दिलासा मिळणार आहे.
पुण्यातून सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी इलेक्ट्रिक बस जात आहे. आणि आता पुढील काळात इतर मार्गांवर देखील इलेक्ट्रिक बसची संख्या वाढणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे. पुण्यामध्ये जवळपास 134 इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अगदी आरामदायी आणि कमी खर्चात होणार आहे.