गाबा टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियावर फॉलो ऑनच सावट आहे. पहिल्या इनिंगमधील ऑस्ट्रेलियाच्या 445 धावांसमोर टीम इंडियाचा संघर्ष सुरु आहे. ऑस्ट्रेलियावर लीड घेणं सोडाच, पण सध्या टीम इंडियाला फॉलो ऑन वाचवावा लागणार आहे. गाबा टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियासाठी हेच मोठ टेन्शन आहे. या दरम्यान टीम इंडियाला एक दिलासा मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाचा एक घातक वेगवान गोलंदाज सामन्यादरम्यान जखमी झाला. त्यामुळे टीम इंडियाच काम सोपं होऊ शकतं.
जोश हेजलवुड ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंग आक्रमणाचा महत्त्वाचा भाग आहे. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये गाबा येथे बॉर्डर गावस्कर सीरीजमधील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. चौथ्या दिवशी जोश हेझलवूडला दुखापतीमुळे मैदान सोडाव लागलं. भारताच्या इनिंगमध्ये चौथ्या दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये त्याने फक्त एक ओव्हर टाकली. हेजलवुडला स्नायूच्या दुखापतीचा त्रास झाला. त्यानंतर त्याला मैदान सोडून बाहेर जावं लागलं.
चिंतेचा विषय
जोश हेजलवुडला दुखापतीनंतर स्कॅनिंगसाठी रुग्णालयात न्यावं लागलं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक्स हँडलवर जोश हेझलवुडच्या दुखापतीबद्दल अपडेट दिली आहे. जोश हेजलवुडने पर्थमधल्या सीरीजच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार बॉलिंग केली होती. त्याने पहिल्या इनिंगमध्ये चार आणि दुसऱ्या इनिंगमध्ये एक विकेट काढला. त्यानंतर तो दुखापतीमुळे एडिलेड टेस्टमध्ये खेळू शकला नाही. त्याच्याजागी स्कॉट बोलँडची ऑस्ट्रेलियन टीममध्ये एन्ट्री झाली. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने गाबा टेस्टमध्ये पुनरागमन केलं. पण ऑस्ट्रेलियन टीमसाठी त्याची दुखापत पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरली आहे.