Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्र144 वर्षानंतरचा अनोखा क्षण, देश-विदेशातील लाखो भाविकांची अक्षरश: लाट, पाहा खास फोटो

144 वर्षानंतरचा अनोखा क्षण, देश-विदेशातील लाखो भाविकांची अक्षरश: लाट, पाहा खास फोटो

जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव अशी ओळख असणाऱ्या महाकुंभ मेळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभचा दिमाखदार मेळावा पार पडणार आहे.

 

उत्तरप्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी असलेल्या गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर आज पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान संपन्न होत आहे. यानिमित्ताने या नद्यांच्या संगमावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

 

प्रयागराज महाकुंभ मेळाव्यादरम्यान एकूण सहा शाही स्नान होणार आहेत. या कुंभमेळाव्यातील पहिले शाही स्नान 13 जानेवारी म्हणजे आज पार पडणार आहे.

 

तर दुसरं शाही स्नान 14 जानेवारी 2025 रोजी मकरसंक्रातीच्या दिवशी असेल. यानंतर तिसरं स्नान 29 जानेवारी 2025 रोजी मौनी अमावस्येदिवशी होईल.

 

तर चौथं स्नान 2 फेब्रुवारी 2025 रोजी वसंत पंचमी दिवशी होईल. यानंतरचे पाचवे शाही स्नान 12 फेब्रुवारी 2025 रोजी माघ पौर्णिमा दिवशी आणि शेवटचं शाही स्नान 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री दिवशी असेल.

 

शेकडो वर्षांपासून कुंभमेळ्याची परंपरा भारतात सुरु आहे. दर 12 वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो. या कुंभमेळ्याला जगभरातून कोट्यावधी भाविक हजेरी लावतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -