बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सध्या सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
बॉलिवूड अभिनेत सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरात चोराने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार, सैफ अली खान याच्या मुंबईतील घरात बुधवारी रात्री एक चोर शिरला होता.
चोराला पाहून सैफच्या घरातील नागरिकांना आरडाओरड सुरु केली. त्यावेळी सैफ अली खानला जाग आली. खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर आमनेसामने आले. यावेळी चोराने पकडले जाण्याच्या भीतीने त्याच्याकडील चाकूने सैफ अली खानवर वार केले. यामध्ये सैफ अली खानला दुखापत झाली आहे. त्याला तातडीने मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सैफ जखमी झाल्यानंतर घरातील नोकरांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. या गोंधळात चोराने पळ काढला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीरतेने दखल घेतली असून चोराला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले आहे.