Wednesday, March 12, 2025
HomeBlogइचलकरंजी : डॉक्टरांच्या गाडीची काच फोडून दीड लाख रुपये लंपास

इचलकरंजी : डॉक्टरांच्या गाडीची काच फोडून दीड लाख रुपये लंपास

इचलकरंजीत डॉक्टरांच्या गाडीची काच फोडून दीड लाख रुपये लंपास करण्याचा प्रकार नुकताच घडला आहे. चारचाकी वाहनाची काच फोडून दीड लाखाची रोकड असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली. ही घटना अलायन्स हॉस्पिटल परिसरात बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी डॉ. संध्या सारंग ढवळे (रा. वीरशैव बँकेजवळ) यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.

डॉ. संध्या ढवळे यांच्यासह अन्य महिला डॉक्टर यांची मिळून भिशी आहे. काल भिशीतील २० सदस्यांची मिळून २ लाखाची रक्कम गोळा केल्यानंतर चिठ्ठीद्वारे भिशीची १ लाखाची रक्कम एका सदस्याला देण्यात आली. तर उर्वरीत १ लाख रुपये व डॉ. ढवळे यांनी हॉस्पिटलमधील ओपीडीची ५० हजार रुपये अशी १ लाख ५० हजाराची रक्कम एका पर्समध्ये ठेवली होती.

सायंकाळच्या सुमारास त्या आपल्या (एमएच ०९ एफक्यु ५३३२) मधून अलायन्स हॉस्पिटल येथे रुग्ण तपासणीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपली चारचाकी हॉस्पिटलच्या भिंतीलगत रस्त्याकडेला पार्किंग केली होती. काही वेळानंतर डॉ. ढवळे या गाडीजवळ आल्या असताना त्यांना गाडीची काच फोडण्यात आल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी तात्काळ गाडीत सीटखाली ठेवलेली पर्स शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पर्स मिळून आली नाही. चोरट्यांनी गाडीची काच फोडून दीड लाखाची रक्कम असलेली पर्स लंपास केली होती. याबाबत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -